Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

या मालिकेत क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत आणि कनिका कपूर ताराच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही कथा दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील व्यक्तींवर आधारित आहे, ज्यांचे एकमेकांशी भावनिक नातं जुळतं आणि नंतर ते नातं प्रेमात रूपांतरि

  • By अमृता यादव
Updated On: Mar 08, 2026 | 07:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्लसने आपल्या आगामी ‘तारा’ या मालिकेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षांची लाट निर्माण झाली आहे. निर्मात्यांनी नुकताच मालिकेचा हटके प्रोमो प्रदर्शित केला असून, प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी खूप आतुर झाले आहेत. या मालिकेत क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत आणि कनिका कपूर ताराच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही कथा दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील व्यक्तींवर आधारित आहे, ज्यांचे एकमेकांशी भावनिक नातं जुळतं आणि नंतर ते नातं प्रेमात रूपांतरित होतं.

ताराची भूमिका साकारणारी कनिका कपूरने या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आणि ती लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “तारा अखेर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, याचा खूप आनंद आणि उत्सुकता आहे. टेलिव्हिजनमध्ये खऱ्या अर्थाने प्रभाव निर्माण करण्याची ताकद असते. या मालिकेच्या कथेत अनेक अर्थपूर्ण संदेश दडलेला असून त्यामुळे समाजातील वर्गवादाच्या भिंती निखळण्यास नक्कीच मदत होईल, अशी मला आशा आहे. तारा ही भावनिकदृष्ट्या सक्षम असून तिच्या वयापेक्षा ती अधिक समजूतदार आहे. लहानपणापासूनच तिने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. ती श्रीमंतीत वाढलेली नाही त्यामुळे संघर्षांनीच तिच्या व्यक्तिमत्त्वात जिद्द निर्माण केली आहे. देवावर असलेला तिचा विश्वास तिला कठीण प्रसंगातही पुढे जाण्याची ताकद देतो.”

अभिनेत्रीने युवराजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “तिचं आणि युवराजचं नातं खूप सुंदर आहे कारण ते दोघे जवळजवळ एकत्रच मोठे झाले आहेत. ताराची नानी त्याच्या घरी काम करते त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा पाया हा बालपणातील मैत्रीवर आणि अनेक वर्षांच्या विश्वासावर, आपुलकीवर उभा आहे. जसजसे ते मोठे होतात तसतसे ही मैत्री आणखी खोल नात्यात बदलू लागते. बस्तीमध्ये जन्मलेल्या ताराच्या प्रवासातून पुढे आयुष्य तिला कुठे घेऊन जाते हे पाहताना प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल आणि कदाचित समाजातील वर्गभेदांच्या भिंतीही तुटायला सुरुवात होईल, अशी मला आशा आहे”

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

चॅनेलसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना कनिका सांगते “स्टार प्लससोबतचे माझे नाते जुनेच आहे. याआधी मी स्टार प्लसवरील अभिनयावर आधारित रिॲलिटी शो इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्या शोमुळेच माझ्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली. तिथे अभिनय प्रशिक्षकांनी मला प्रशिक्षण दिले आणि अभिनयाची कला शिकवली. माझ्या प्रवासाची सुरुवात ज्या व्यासपीठावरून झाली त्या स्टार प्लसबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन”

तारा ही सामाजिक भेदांनाही न जुमानता प्रेम आणि आवेशाने पुढे जाणाऱ्या नात्याची हृदयस्पर्शी कथा आहे जी समाजातील भिंतींना आव्हान देणाऱ्या नात्याचे चित्रण करते.

प्रभासच्या ‘फौजी’ मध्ये अनुपम खेर यांची दमदार एंट्री, वाढदिवसानिमित्त मेकर्सने पोस्टर केलं रिलीज

Web Title: In star plus tara serial kanika kapoor unveils taras secrets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • serial update

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.