Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्रीनिमित्त ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे विशेष पर्व पाहायला मिळणार आहे. स्वामी आणि रणजीतचा संघर्ष रंगणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jai Jai Swami Samarth: नवरात्री म्हणजे आदिशक्तीचा उत्सव, स्त्रीच्या सामर्थ्याचा जागर आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा. याच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत एक भव्य, नाट्यमय आणि प्रेरणादायी पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ या विशेष भागांमध्ये स्वामी काही पीडित स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्या मनात दडलेल्या शक्तीची जाणीव करून देणार आहेत.

रणजीतच्या अत्याचाराविरोधात चार स्त्रिया एकवटणार

या विशेष पर्वाच्या केंद्रस्थानी आहे अक्कलकोटच्या सुभेदाराचा मेव्हणा रणजीत. सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करत रणजीतने गावातील अनेकांवर अन्याय केला आहे. त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या चार स्त्रियांची कहाणी या विशेष पर्वातून समोर येणार आहे.

या चौघींची परिस्थिती वेगळी असली तरी त्यांच्या वेदनेचं मूळ एकच आहे आणि ते म्हणजे रणजीतची महिषासुरी प्रवृत्ती. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये स्वामी विरुद्ध रणजीत असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

मधुवंतीच्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश

या कथेची सुरुवात होते ती स्वामींच्या एका विलक्षण लीलेने. येणाऱ्या नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर होणार असल्याची जाणीव स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना करून देतात. त्यानंतर चार स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्षाची काळी बाजू उलगडू लागते.

यातील पहिली कथा आहे मधुवंतीची. अवघ्या २१ वर्षांच्या मधुवंतीचं कुंकू रणजीतमुळे पुसलं गेलं आहे. रणजीतसोबत कुस्तीत जिंकलेल्या तिच्या पतीची त्याने हत्या केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर मंदिरात जाऊन न्यायासाठी आक्रोश करणाऱ्या मधुवंतीच्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश होतो.

मधुवंतीला धीर देत स्वामी तिला “तुला न्याय मिळेल” असं आश्वासन देतात. मात्र, न्याय मिळवण्याचा तिचा हा प्रवास सोपा नसतो. रणजीत तिच्या दुःखातही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या पतीच्या मृत्यूनंतरच्या विधींमध्येही तो विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, प्रत्येक वेळी स्वामींची लीला मधुवंतीच्या मदतीला धावून येणार आहे.

‘तू विसरतो आहेस… नवरात्र येत आहे!’

मधुवंतीच्या कथेसोबतच स्वामी आणि रणजीत यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडते. स्त्रियांच्या आत्मसन्मानाला आव्हान देणाऱ्या रणजीतला स्वामी ठाम शब्दांत सुनावतात.

स्त्रिया दुर्बल आहेत आणि त्या आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असा अहंकार रणजीतच्या मनात आहे. मात्र, स्वामी त्याला स्त्रीच्या अंतरंगात दडलेल्या देवीशक्तीची जाणीव करून देतात.

“तू विसरतो आहेस… नवरात्र येत आहे!” हा स्वामींचा इशारा रणजीतला हादरवून सोडतो. ज्यांना तो आजवर दुर्बल समजत आला, त्याच स्त्रिया आता त्याच्याविरोधात उभ्या राहणार आहेत.

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

धमक्या, दबाव आणि सत्तेचा गैरवापर

चारही स्त्रियांना नामोहरम करण्यासाठी रणजीत आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. धमक्या, दबाव, हल्ले आणि सत्तेचा गैरवापर करून तो त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, प्रत्येक संकटात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.

नवरात्रीच्या या विशेष पर्वात चार पीडित स्त्रियांचा प्रवास दुःखातून संघर्षाकडे आणि संघर्षातून आत्मसामर्थ्याकडे होताना पाहायला मिळणार आहे. या प्रवासाची परिणती विजयादशमीच्या सीमोल्लंघनात होणार आहे.

स्वामींच्या लीलेतून स्त्रीशक्तीचा जागर

या चार स्त्रियांमध्ये दडलेली शक्ती नेमकी कशी जागी होणार? रणजीतच्या अत्याचारांना त्या कशा सामोऱ्या जाणार? आणि या संपूर्ण संघर्षात स्वामींची लीला त्यांना कुठपर्यंत घेऊन जाणार? या प्रश्नांची उत्तरं ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ या विशेष भागांमध्ये मिळणार आहेत.

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील हे विशेष पर्व केवळ चार स्त्रियांच्या संघर्षाची कथा नसून, स्त्रीच्या आत्मसन्मानाची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या सामर्थ्याची गोष्ट मांडणार आहे.

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Web Title: Jai jai swami samarth serial jagar shakticha mahima swamincha ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
1

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
3

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
4

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.