Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Nimrat Kaur: निमरत कौरने शहीद वडील मेजर भूपेंद्र सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात वडिलांचं अपहरण आणि त्यानंतरची घटना तिने सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 03:21 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nimrat Kaur:  अभिनेत्री निमरत कौर हिने तिच्या शहीद वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंह हे ३२ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. नुकत्याच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत निमरतने वडिलांच्या हत्येची घटना, त्यानंतर कुटुंबावर ओढवलेलं दुःख आणि आईने दोन्ही मुलींचा केलेला सांभाळ याबद्दल सांगितलं.

सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलं अपहरण

निमरतने सांगितलं की, तिच्या वडिलांचं एका सामान्य कामाच्या दिवशी अपहरण करण्यात आलं होतं. दहशतवाद्यांनी सैनिकांचा वेश परिधान केला होता. ते कर्तव्यावर जात असताना आणि परत येत असताना त्यांना या लोकांनी सोबत नेलं.

“एका सामान्य कामाच्या दिवशी त्यांचं अपहरण झालं. ते त्यांच्या कर्तव्यासाठी कुठेतरी जात होते आणि परत येत असताना सैनिकांचा वेश धारण केलेल्या लोकांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांनी लष्करी गणवेश घातला होता आणि ते त्यांना सोबत घेऊन गेले,” असं निमरतने सांगितलं.

सात दिवस दहशतवाद्यांकडून वेगवेगळ्या मागण्या

वडिलांचं अपहरण झाल्यानंतर कुटुंबाला त्यांच्या सुटकेची आशा होती. मात्र, सात दिवसांच्या कालावधीत दहशतवाद्यांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या. यापैकी काही मागण्या तुरुंगात असलेल्या व्यक्तींच्या सुटकेशी संबंधित होत्या.

निमरतने सांगितलं की, सातव्या दिवशी कुटुंबाला तिच्या वडिलांची हत्या झाल्याची बातमी मिळाली.

‘पहिल्यांदा कामावर जाताना पाहिलं, दुसऱ्यांदा शवपेटीत’

वडिलांच्या आठवणी सांगताना निमरतने त्या काळातील धक्कादायक अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “त्या दिवशी सकाळी मी माझ्या वडिलांना कामावर जाताना पाहिलं. मला फक्त ते निघून गेल्याचं आठवतं आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना दुसऱ्यांदा पाहिलं, तेव्हा ते शवपेटीत होते.”

या घटनेतून आपल्याला कधीच पूर्णपणे बाहेर पडता आलं नाही, असंही तिने सांगितलं.

 

आईने एकट्याने केला दोन्ही मुलींचा सांभाळ

वडिलांच्या निधनानंतर निमरतची आई त्यावेळी खूप तरुण होती. त्यांनी निमरत आणि तिच्या बहिणीचा एकट्याने सांभाळ केला. कठीण परिस्थितीत आईने ज्या पद्धतीने कुटुंबाला सावरलं, त्याबद्दल निमरतने तिचं कौतुक केलं.

“ज्या प्रकारे माझ्या आईने आमचं संगोपन केलं आणि नंतर तिचं व आमचं आयुष्य पुन्हा उभारलं, ते फार कमी स्त्रिया एकट्याने इतक्या सन्मानाने आणि सहजतेने करू शकल्या असत्या,” असं निमरतने म्हटलं.

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

‘बाबांनी देशाची सेवा करून ३२ वर्षे झाली’

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त निमरतने त्यांची आठवण काढत एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. “बाबांनी देशाची सेवा करून ३२ वर्षे झाली आहेत. ते एक खरे सुपुत्र, एक खरे नायक, एक अद्भुत पती आणि वडील होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते सिंहासारखे धाडसी सैनिक होते,” अशा शब्दांत तिने वडिलांना आदरांजली वाहिली.

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Web Title: Nimrat kaur father martyr kashmir terrorist attack ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
2

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
3

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.