Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

Exclusive: कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी छवी अर्थात अभिनेत्री जान्हवी तांबटने नवराष्ट्रच्या खास ‘माझ्यातली दुर्गा’ सिरीजमध्ये आपली परखड मतं व्यक्त केली आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 16, 2026 | 07:39 AM
Exclusive: कलर्स मराठीवरील 'मी जिंकून घेईन सारं' मधील छवी अर्थात जान्हवी तांबटबरोबर गप्पा

Exclusive: कलर्स मराठीवरील 'मी जिंकून घेईन सारं' मधील छवी अर्थात जान्हवी तांबटबरोबर गप्पा

Follow Us
Follow Us:

Exclusive: कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतून मुख्य भूमिकेतून छवी म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जान्हवी तांबटने ‘माझ्यातील दुर्गा’ या सिरीजमध्ये आपल्या स्वतःच्या अनुभवांपासून ते आयुष्यातील दुर्गेपर्यंत अगदी मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. नेहमी सकारात्मकतेचा झरा कसा वाहता राहिला पाहिजे याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जान्हवी. तिच्या मनमोकळ्या गप्पांनी नवराष्ट्रचा स्टुडिओ भारावून गेला. 

एका सीनसाठी तू सलग ६-७ तास बर्फावर अनवाणी उभी होतीस; शारीरिक वेदना विसरून पूर्णपणे कॅरेक्टरमध्ये झोकून देण्याची ती ‘दुर्गा ऊर्जा’ तुझ्यामध्ये कशी जागी झाली? यावर जान्हवीने अगदी उत्साहाने सांगितलं की, ‘मी जिंकून घेईन सारं’ च्या सेटवर जेव्हा बर्फाची लादी पाहिली तेव्हा पहिले तर पोटात गोळा आला. मला वाटलं होतं की, थोडाच वेळ असेल. पण मी सर्व गोष्टींसाठी स्वतःच्या मनाला तयार केलं आणि मला काही होणार नाही आणि सर्व छान करायचं आहे सांगत राहिले. बर्फावर पहिलं पाऊल ठेवलं आणि प्रचंड डोक्यात सणक गेली होती. पण खरं सांगू का? सीन करताना काहीही लक्षात नाही राहत. रंगदेवता, बाप्पा, स्वामी माझ्यासोबत होते त्यामुळे सर्व छान झालं असं मला वाटतं. एका पॉईंटला पाय सुन्न पडू लागले आणि पाय नॉर्मल हलवता येत नव्हता. पण आपल्यालतील दुर्गा आणि शक्तीच आपल्याला तारते असं मला वाटतं’

तू म्हणालीस तसं हा ‘नेव्हर गिव्ह अप’ माइंडसेट तू कसा तयार केलास? जान्हवीचा सकारात्मक स्वभाव यातून दिसून आला आणि त्याच सहजपणाने ती म्हणाली की, ‘खूप अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या की, यातून काहीच होऊ शकत नाही असं वाटलं होतं. पण सकारात्मकता अशी गोष्ट आहे ना ती खूपच महत्त्वाची आहे. मी आधी खूपच विचित्र विचार करायचे. पण आता नकारात्मक अजिबात बोलायचं नाही. हा विचार घेऊनच मी पुढे जाते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर NSD मध्ये जायचं होतं. पण दुर्दैवाने वडील गेल्यानंतर सर्व काही पालटलं. मग ते तिथेच ड्रॉप झालं. पण लॉकडाऊन माझ्यासाठी काळ पालटणारा ठरला. त्याकाळात मी कामही केलं आणि तेव्हाच मी अभिनयात पदार्पणाचा निर्णय घेतला. काही वेळा बॅकफूटवर आले पण पाहिलेलं स्वप्नं पूर्ण करायचंच आहे हा निर्णय घेतला आणि प्रयत्न चालू ठेवले आणि अखेर अभिनय क्षेत्रात आले. कधीही गोष्ट सोडून द्यायची नाही हे कायम लक्षात असल्यामुळेच हे घडू शकलं आणि यातूनच कसं जगायचं हे कळत गेलं’  

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

संघर्ष सुरु असेल आणि दोन पर्याय असतील तर महिलांना कोणता सल्ला देशील? यावर जान्हवी पटकन म्हणाली की, ‘स्वप्नं पूर्ण होतात, ती बघा आणि त्या दिशेने वाटचाल सुरु करा. मध्ये खूप चढउतार येतील. पण अजिबात हार मानू नका. कोणताही निर्णय घेताना जो पहिला विचार येतो तोच योग्य असतो. कधीही स्वतःची स्वप्नं अर्धवट सोडू नका आणि स्वतःला नेहमी सकारात्मकच ठेवा. कारण वास्तू तथास्तु कधीही म्हणू शकते असं मला वाटतं. सकारात्मक विचार केला तर सर्व काही चांगलं आहे.’

या आभासी जगात स्वतःचं ‘अस्सल’ रूप जपताना कधी मानसिक थकवा येतो का? यावर अगदी मनापासून जान्हवीने सांगितलं की, ‘थकायला तर होतंच. कारण १२-१३ तास काम करत असतो. शरीर इतकं थकतं की, कधी कधी शेवटी आठवणंही बंद होतं. मोठे सीन्स असतात, पण तरीही एनर्जी असते. तुम्ही कितीही आजारी असाल तरीही रंगदेवतेचा एक आशीर्वाद असतो की, कलाकार म्हणून तुम्ही त्याच एनर्जीने काम करता. आपली विचार करण्याची पद्धत सकारात्मक ठेवली तर थकवा असला तरीही व्यवस्थित काम करता येतं.’

या सगळ्यात नातं जपताना दमछाक होते तर कशी जपतेस? जान्हवी पटकन म्हणाली की, ‘मला ना माझी माणसं लागतात कारण मी कुटुंबवत्सल आहे.  दुसरी मालिका सुरू झाल्यानंतर आई-आजीला घेऊन आले. लहानसहान गोष्टींनी घरातील सर्वांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. अजूनही आईला थँक्स म्हणायला अगदी सहज काहीतरी पाठव. बहिणीसाठी काहीतरी कर असं माझं चालू असतं. त्यामुळे आपल्या माणसांना जपणं महत्त्वाचं आहे आणि ते कामातूनही मी करते.’

दुर्गेची विविध रुपं तुझ्या आयुष्यात आहेत, आई-आजी-बहीण, भारती आचरेकर यांच्याकडून काय शिकतेस? जान्हवी यावर कुठेही न थांबता म्हणाली की, ‘भारती मॅम म्हणजे दुर्गेचं रुपच आहे आणि मला कायम तिच्यासारखं रहायचं आहे. तिच्यासोबत काम कऱण्याचा अनुभव कमाल आहे. इतकं काम करूनही ती इतकी साधी आणि जमिनीवर पाय टेकलेली सेलिब्रिटी आहे. कामाशी प्रामाणिक कसं रहायचं हे मी तिच्याकडून शिकले. 

आणि आई-आजी-बहीण या तर माझ्या पिलर्स आहेत. माझी ७६ वर्षांची आजी जे साध्य करायचं आहे ते कर हे अगदी ठामपणे मला कायम सांगत आली आहे आणि माझी मुलगी कशी आहे, तुम्ही कोणीही सांगू नका हा स्टँड कायम माझ्या आईने घेतला आणि तिच्यातली दुर्गा मला दिसली होती. मला असं वाटतं की, आई-आजी-बहीण या सगळ्यांमध्येच दुर्गा आहे.’

तुझ्यासाठी आजची दुर्गा काय आहे? स्त्री ने स्त्री साठी उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे का तुला काय वाटतंय? जान्हवीने अगदी पटकन म्हटलं की, ‘प्रचंड महत्त्वाचं आहे. कारण यातून उर्जा मिळते. मला फक्त स्वतःसाठी काही करायचं नाही तर माझ्या स्वप्नासह माझ्या आयुष्यातील स्त्रीसाठीही करायचं आहे. वाईट विचार काढून टाका, चांगलंच होईल.

आता पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. महिला आता सगळ्या पातळीवर पुढे असून दोन्ही घरातील माणसं सांभाळून सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. मासिक पाळीत प्रचंड त्रास असतो, पण त्यातूनही काम करत असतो हे कारण न देता करत असतो. मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाहीये हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या दुर्गेचा अनोखा विचार आहे. आजची दुर्गा म्हणजे जे तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवा, एनर्जी ओळखायला शिका.’

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

सचिन पिळगावर यांच्यासह लवकरच कापूसकोंडा चित्रपट येतो आहे, तर अनुभव कसा आहे? जान्हवीने आपले अनुभव सांगत म्हटले की, ‘सचिन पिळगावकर यांच्यासह काम करण्याचा अनुभव कमाल आहे. कारण त्यांना लहानपणापासून पाहिलंय. अजूनही सर्व स्वप्नवत वाटतंय. त्यांच्याबाजूला बसल्यावर वाटतं की, मी स्वप्नं पाहतेय. त्यांच्याविषयी शब्द नाहीत माझ्याकडे. मधुराणी गोखलेला पाहून वाटलं की, मी कसं काम करेन पण तिने आपलंसं करून घेतलं. चित्रपट विठ्ठलभक्तीवर असून ही घटना सत्यकथेवर आहे. हा चित्रपट माझ्यासाठी फार स्पेशल आहे.’

मालिकेतून भेटणारी छवी ही खऱ्या आयुष्यातही तितकीच सकारात्मक आणि परखड मत मांडणारी आहे. जाता जाता जान्वही म्हणाली की, सध्या मानवता-माणुसकी हरवत चालली आहे. विकृतपणा वाढला आहे आणि जर मला दुर्गेची तलवार मिळाली तर ही गोष्ट संपवायला मला नक्की आवडेल. 

Web Title: Exclusive mi jinkun ghein sara fame janhavi tambat shared thoughts on mahila shakti navaratri dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 07:39 AM

Topics:  

  • colors marathi
  • entertainment

संबंधित बातम्या

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका
1

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
2

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
3

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?
4

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.