Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात १०.३ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५.७ कोटींचा गल्ला जमवला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Nayi Naveli Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कमाईत वाढ नोंदवली आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १०.३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

‘नई नवेली’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात ४.६ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५.७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे दोन दिवसांतील चित्रपटाची एकूण जगभरातील ग्रॉस बॉक्स ऑफिस कमाई (GBOC) १०.३ कोटी रुपये झाली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत झालेली वाढ चित्रपटासाठी सकारात्मक मानली जात आहे.

Rakhi Sawant: १६ वर्षांपूर्वीचं प्रकरण राखी सावंतला भोवलं! न्यायालयाचा मोठा निर्णय, अजामीनपात्र वॉरंट जारी
फॅन्टसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अनोखा संगम

फॅन्टसी, अ‍ॅक्शन आणि कौटुंबिक भावनांची सांगड घालणारा ‘नई नवेली’ प्रेक्षकांना एक वेगळा मनोरंजनात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन महाकाव्यांपासून प्रेरणा घेतलेली कथा, अनपेक्षित वळणं आणि चांगल्या-वाईटातील संघर्ष हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. यामी गौतम एका दमदार कलाकारांच्या संचासह आवस्थी कुटुंबाच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते.

यामी गौतमचा वेगळा अंदाज, हटके व्यक्तिरेखा आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक प्रसंग यामुळे चित्रपटाची चर्चा होत आहे. सणासुदीच्या काळात कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा पर्याय म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा

दिग्दर्शनापासून संगीतापर्यंत दमदार टीम

बालाजी मोहन यांनी ‘नई नवेली’चे दिग्दर्शन केले असून, हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. यामी गौतमसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवर, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत.
आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर संगीताची जबाबदारी जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सांभाळली आहे.
अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर यलो प्रस्तुत ‘नई नवेली’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत झालेली वाढ पाहता, आगामी दिवसांत चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nayi naveli box office collection yami gautam movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Box Office
  • entertainment
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
1

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
2

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
3

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा
4

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.