Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adinath Urmila Divorce: ‘जोडीदार म्हणून प्रवास इथेच संपत….’, आदिनाथ -उर्मिलाने वेगळं होण्याचा घेतला निर्णय, मुलीसाठी भावूक पोस्ट

Adinath Urmila Divorce: मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मुलगी जिजासाठी दोघांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 01:19 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ कोठारे. यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी अनेक वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुलगी जिजासाठी दोघेही कायम एकत्र पालक म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आदिनाथ कोठारे पोस्ट

आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उर्मिला कानेटकर यांच्यासोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. त्याने लिहिलं की, दोघांनीही एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्टमध्ये आदिनाथ याने सांगितलं की, “जिजा आमच्यासाठी सर्वस्व आहे. तिच्यावर आमचं प्रेम, सुरक्षितता आणि मार्गदर्शन कायम राहील. तिच्यासाठी आम्ही दोघेही पालक म्हणून एकत्र जबाबदारी पार पाडत राहू.”

तसेच त्याने उर्मिलासोबतच्या नात्याबद्दल आदर व्यक्त करत, “आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील,” असं म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांत माध्यमं आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानत त्याने चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. मुलगी जिजाच्या चांगल्या भविष्यासाठी दोघेही प्रेम आणि समजूतदारपणाने पुढे जात राहतील, असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

उर्मिला आणि आदिनाथ यांचा 2011 ला विवाहसोहळा पार पडला

उर्मिला आणि आदिनाथ यांची ओळख मैत्रीतून झाली. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतर उर्मिला कोठारे कुटुंबाची सून झाली.

२०१७ मध्ये या दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाची भर पडली. उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव जिजा असून, दोघेही अनेकदा मुलीसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसले.

मात्र, मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांनी उर्मिला आणि आदिनाथ यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा मनोरंजन वर्तुळात रंगू लागली. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनीही जोर धरला होता, आज अखेर आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली. यामुळे या दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Marathi actor adinath kothare and urmila kothare have announced their divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • adinath kothare
  • Divorce
  • marathi actress

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
1

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

Tejaswini Pandit: ‘त्यांच्या संस्कारांचं दप्तर..’, आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली…
2

Tejaswini Pandit: ‘त्यांच्या संस्कारांचं दप्तर..’, आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली…

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य
3

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

Apurva Nemlekar: अमेरिकेत रंगली अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर; नऊवारी साडी, झिम्मा-फुगडी अन् मराठमोळा थाट!
4

Apurva Nemlekar: अमेरिकेत रंगली अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर; नऊवारी साडी, झिम्मा-फुगडी अन् मराठमोळा थाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.