Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी OTT चा पहिलावहिला डिटेक्टिव्ह! आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचं विशेष कौतुक

पहिल्यांदाच मराठी ओटीटीवर महाराष्ट्राच्या डिटेक्टिव्हचं काम दाखविण्यात आलं आहे आणि ही भूमिका आदिनाथ कोठारेने अगदी चपखलपणे साकारली आहे. सध्या त्याच्या या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक होतंय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 04, 2026 | 11:13 AM
आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक

आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक

Follow Us
Follow Us:
  • आदिनाथ कोठारेची नवीकोरी सिरीज 
  • मराठी झी५ वर डिटेक्टिव्ह धनंजय 
  • सर्वच स्तरावर अभिनयाचं कौतुक 
आजवर मराठी सिनेविश्वापासून ते अगदी ओटीटी पर्यंत सगळीकडे प्रयोगशील प्रोजेक्ट बघायला मिळतात आणि अश्यातच पहिल्यांदा मराठी ओटीटीवर एक नवी कोरी डिटेक्टिव्ह वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून झी 5 मराठी वर डिटेक्टिव्ह धनंजय ही वेब सीरिज प्रेक्षकांच मन जिंकून घेणार यात शंका नाही.  “डिटेक्टिव्ह धनंजय” मध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे करारी नजर असलेल्या आणि रहस्यजाल सोडवणाऱ्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. झी ५ मराठी प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिज मध्ये त्याची भूमिका ही लक्षवेधी ठरतेय.

Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल

पहिल्यांदाच मराठी ओटीटीवर 

हिंदी इंग्रजी सिनेविश्वात आणि ओटीटी वर या आधी प्रेक्षकांनी अनेक डिटेक्टिव्ह शो पाहिले पण मराठीत ओटीटी विश्वात पहिला वहिला डिटेक्टिव्ह होण्याचा मान आदिनाथ कोठारे ने पटकावला आहे आणि हा डिटेक्टिव्ह लोकांना खिळवूनदेखील ठेवतोय. 

आदिनाथ कोठारेने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असून ही भूमिका त्याचासाठी  खास का आहे यावर तो सांगतो “मी प्रयत्न करत होतो की मराठीत एक आयकॉनिक डिटेक्टिव घेऊन यावा आणि श्रीरंग गोडबोले यांच्या सोबतीने तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली हि सीरिज नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मराठी ओटीटी विश्वातला पहिला वहिला डिटेक्टिव्ह साकारण्याची मला संधी या निमित्तानं मिळाली आहे याचा खूप आनंद आहे”

रहस्य आणि थराराची नवी मालिका! ‘मराठी ZEE5 ची गूढकथा “डिटेक्टिव्ह धनंजय” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

धनंजयचे पात्र उलगडणार 

“डिटेक्टिव धनंजय “ ही वेब सीरिज श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या मराठी इंडस्ट्री मधली दोन बड्या निर्मिती संस्थानी एकत्र येऊन निर्मित केली आहे.  कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशो मधून उलगडणार आहे . ओटीटी विश्वात आदिनाथने पुन्हा एकदा जोरदार धमाका केला आहे आणि त्याचा लूक ने सगळ्याचं लक्ष वेधून घेतल आहे. करारी नजर आणि आदिनाथचा डिटेक्टिव अंदाज चर्चेचा विषय ठरतोय. येणाऱ्या काळातदेखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार असून तो अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

याबाबत आदिनाथने ‘नवराष्ट्र’ला दिलेल्या मुलाखतीमधा्ये सांगितलं होतं की डिटेक्टिव्ह धनंजय नक्की कसा आहे आणि त्याची छोटूशी मैत्री कशी आहेत. याशिवाय या दोघांमधील केमिस्ट्री कशी आहे. या दोघांची केमिस्ट्री खूपच गंमतीशीर असून प्रेक्षकांना ही जोडी नक्की आवडेल असंही पुष्कराज आणि आदिनाथ या दोघांनी सांगितलं.

Web Title: Marathi ott platform first detective adinath kothare acted as dhananjay viewers impressed with his work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • adinath kothare
  • Entertainment News
  • marathi zee5

संबंधित बातम्या

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट
1

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
2

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे
3

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे

Tumbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर! दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…
4

Tumbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर! दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.