Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान

Kirtan Movie Poster Launched: डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या निर्मितीतून साकारत असलेल्या ‘कीर्तन’ या चित्रपटाचे पोस्टर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका भव्य सोहळ्यात प्रकाशित करण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 03:51 PM
Kirtan Movie Poster Launched: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kirtan Movie Poster Launched: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कीर्तन’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
  • २०२७ मध्ये जगभरात एकाच वेळी प्रदर्शित
  • सामाजिक कार्यासाठी दोन कोटींचे योगदान

कॉर्पोरेट क्षेत्रातील अतिशय उज्वल आणि स्थिर कारकीर्द केवळ आपल्या पित्याच्या इच्छेनुसार सोडून देऊन आध्यात्मिक आणि राष्ट्र उभी करणारी पिढी घडविण्यासाठी आपले मृत्युपत्र तयार करून समर्पित कीर्तनकार होण्याचा निर्णय घेणारे डॉ. चेतनानंद महाराज यांची निर्मिती असलेल्या ‘किर्तन’ या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन नेत्रदीपक सोहळ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

“|| भक्ती की बाजार | तुच सांग विठ्ठला ||” ही टॅगलाईन असलेल्या “कीर्तन” च्या पोस्टरमध्ये विठू माऊलीचे रूप आणि भक्ताची निस्सीम व निरपेक्ष भावना अत्यंत भावूक व प्रभावी रीतीने दर्शविण्यात आली आहे. हा चित्रपट केवळ भक्तीचा महिमा सांगणारा नसून, आजच्या काळातील श्रद्धा, अंधश्रद्धा, मानवी मूल्ये, समाजातील व परंपरेतील काळानुरूप बदलणारी स्थित्यंतरे, वारकरी, वारी आणि परमेश्वरावरील अढळ विश्वास यांचा एक प्रगल्भ प्रवास प्रेक्षकांसमोर उभा करणार आहे. Kirtan Movie Poster Launched:

वारकरी परंपरा आणि भक्तिभावाचा असीम व भावनाप्रधान अत्युच्च अनुभव देणारा हा चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून संपुर्ण जगभरात एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

कार्यक्रमात बोलताना “जगद्गुरू संत तुकाराम महाराज, विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनकार्याच्या व मानवाच्या कल्याणासाठी दिलेल्या ज्ञानाच्या प्रेरणेतूनच डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर सध्याच्या काळात आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. जे का रंजले गांजले | त्यासी म्हणावे आपुले, हा संदेश त्यांनी आपल्या आयुष्यात उतरवला आहे.

त्यांच्या चित्रपटांमधून युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानव म्हणून उत्तम जगण्याबरेबरच आध्यात्म, इतिहास आणि लोकसेवेचा संदेश देण्याचे कार्य प्रभावीपणे केले जाईल” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आणि “कीर्तन” या भव्य चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर हे एक व्यक्तिमत्त्व

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी “बोलतो तेच करतो” असा विश्वास देणारी व्यक्तिमत्त्व सध्याच्या काळात दुर्मिळ झाली असून मात्र त्यापैकी डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर हे एक व्यक्तिमत्त्व आहेत व त्यांनी आपल्या संकल्पीत जीवनकार्यातुन व कृतीतून हे दाखवून दिले आहे. सध्या स्पर्धेच्या युगात समाज माध्यमांसह विविध माध्यमांतून केवळ तणाव निर्माण होत असल्याने “कीर्तन” हा चित्रपट समाजाच्या दुःखाचे निवारण करून त्यांचे प्रबोधन करुन योग्य मार्ग दाखवण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकेल.

डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या राष्ट्र उभारणीला पूरक ठरणाऱ्या अन्य विविध उपक्रमांसाठी निश्चितपणे सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल” अशी ग्वाही त्यांनी दिली व या चित्रपटाला ताकतीने सर्वदूर पोहचविण्यासाठी आम्हीं कटिबद्ध आहोत हे अभिवचन दिले.

चित्रपटाचे प्रमुख कलाकार

यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्रीगुरु डॉ. नारायण महाराज जाधव बाबा, खासदार श्रीरंग बारणे, ए.ए. फिल्मस् प्रमुख व विख्यात चित्रपट वितरक अनिल थडानी, राज्य महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार, भारताचे माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव, अनेक आजी माजी विधीमंडळ सदस्य, पदाधिकारी यांच्यासह पंढरपूर, देहु, आळंदी, दगडूशेठ गणपती, जंगली महाराज संस्थान यांचे विश्वस्त व पदाधिकारी यांच्यासह आध्यात्मिक, सामजिक, औद्योगिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि चित्रपटातील प्रमुख कलाकार संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, आर्या घारे, तेजस बर्वे, सुरेश विश्वकर्मा, बालकलाकार गोरज देखणे, गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार विजय गावंडे यांच्यासह दिग्दर्शक अतुल जगदाळे आणि चित्रपटाचे प्रमुख कलाकार उपेंद्र लिमये यांच्या वतीने त्यांच्या पत्नी स्वाती लिमये यांसह हजारो संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

Phulwara Teaser: घुंगरांचा नाद अन् मातीचा सुगंध! महाराष्ट्राच्या लावणीची झलक दाखवणारा ‘फुलवरा’चा टीझर प्रदर्शित

चित्रपट निर्मिती हा एक अत्यंत

राष्ट्राच्या उभारणीसाठी व मानव कल्याणाचा विचार करणारी सक्षम पिढी ही केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणार नाही तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला अध्यात्म व समर्पण भावनेची जोड देणे आवश्यक आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातील संत परंपरेचा विचार युवा पिढी व समाजापर्यंत पोहोचवण्यामुळेच शक्य होणार आहे म्हणून आपण जे जीवनकार्य म्हणून स्वीकारले आहे त्यातीलच चित्रपट निर्मिती हा एक अत्यंत प्रभावी उपक्रम असल्याचे डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संत व वारकरी साहित्य पूजनाने झाली. यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी काही भक्ती गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिनेते संदीप पाठक यांनी केले.

चौकट / विशेष

आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांना व व्यक्तींना तब्बल दोन कोटी रुपयांचे कार्य व धनादेशाचे वितरण

डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे कार्य केवळ शाब्दिक ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून त्यांनी आपल्या कृतीतून समाजकार्याचा आदर्श घालून दिल्याचे या कार्यक्रमात दिसून आले. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच आर्थिक अडचणींमुळे संधी नाकारल्या गेलेल्या काही कुटुंबांना असे एकुण तब्बल दोन कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले.

Ulhas Kamathe: ‘चिकन लेग पीस’ वाल्या उल्हास कामटेचं निधन? हार्ट अटॅकच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कोट्यावधीची देणगी

आपल्या वडिलांच्या अखेरच्या इच्छेनुसार कॉर्पोरेट क्षेत्रातील उज्वल भवितव्याचा त्याग करून, राजकीय अनेक संधी मिळत असतानाही केवळ समाज घडविण्याचा व आध्यात्मिक क्षेत्राचा, आपल्या परंपरेचा वसा घेणारे आणि मातेचे इच्छेनुसार काही मंदिर उभारणीसाठी कोट्यावधीची देणगी मिळून देणाऱ्या डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे कुटुंब आजही पुण्यात भाड्याच्या घरात राहत असल्याचे व गावी केवळ 300 स्क्वेअर फुटांचे साधे घर आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर उपस्थितांचे डोळे विस्फारले.

Web Title: Kirtan marathi movie poster launch chandrashekhar bawankule 2027 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainment News
  • Marathi News

संबंधित बातम्या

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
1

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher
2

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर
3

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Upcoming IPOs India: IPO बाजारात मोठी धमाका! OYO ते Razorpay, 10 कंपन्या गुंतवणूकदारांच्या भेटीला
4

Upcoming IPOs India: IPO बाजारात मोठी धमाका! OYO ते Razorpay, 10 कंपन्या गुंतवणूकदारांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.