Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट

Marathi Serial: मी जिंकून घेईन सारं मालिकेत अनिकेत-छवी पुन्हा राजगुरूंच्या घरात प्रवेश करणार आहेत. शांभवीचा काळा भूतकाळ उघड होणार का? जाणून घ्या पुढील भागातील रंजक ट्विस्ट.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 01:10 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. अनिकेत आणि छवीच्या आयुष्यात एकीकडे प्रेमाचे क्षण फुलत असताना दुसरीकडे शांभवीचे कटकारस्थान सुरूच आहे. मात्र, आता अनिकेत आणि छवीच्या घरवापसीने शांभवीसमोर नवे आव्हान उभे राहणार आहे.

बाईआजी अनिकेत आणि छवीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याने दोघांनाही मोठा आधार मिळाला आहे. बाईआजींनी त्यांची बाजू घेतल्याने शांभवीच्या मनातील संताप आणखी वाढला आहे. अनिकेत आणि छवी पुन्हा राजगुरूंच्या घरात प्रवेश करणार असल्याने घरातील नात्यांचे आणि सत्तासमीकरणाचे चित्र बदलणार आहे.

शांभवीचे कटकारस्थान सुरूच

अनिकेत आणि छवी घराबाहेर असताना शांभवीने आपले डावपेच सुरू ठेवले आहेत. बाईआजींना त्रास देण्यापासून ते कियाराच्या खोट्या दुःखाचा फायदा घेण्यापर्यंत ती विविध प्रकारे आपले मनसुबे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

राजगुरू कंपनीच्या अकाउंट्सवर लक्ष ठेवून बाईआजींच्या नातवांना एकामागून एक घराबाहेर काढण्याचा तिचा डाव आहे. अनिकेतनंतर आता कियारालाही लक्ष्य करण्याचा विचार तिने कामिनीजवळ व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर अनिकेतच्या दुखापतीचा फायदा घेत वत्सलाला छवीविरोधात भडकवण्याचा प्रयत्नही शांभवी करत आहे.

Toxic Movie Review: यशचा दमदार डबल रोल अन् खिळवून ठेवणारा सस्पेन्स, कसा आहे ‘टॉक्सिक’?

अनिकेत-छवीच्या हाती लागणार शांभवीचं गुपित?

दरम्यान, अनिकेतने राजनाथच्या फोनचे लोकेशन ट्रॅक केले आहे. या शोधमोहिमेदरम्यान अनिकेत आणि छवीला शांभवीच्या भूतकाळाशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. तिच्या काळ्या भूतकाळाचा भक्कम पुरावा त्यांच्या हाती लागल्यास शांभवीसाठी परिस्थिती आणखी कठीण होणार आहे.

या सगळ्या तपासादरम्यान अनिकेत आणि छवीमध्ये प्रेमाचे क्षणही पाहायला मिळणार आहेत. पावसातली सायकल राईड, चहा आणि भुट्ट्याच्या निमित्ताने दोघांच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसणार आहे.

शांभवीचा डाव तिच्यावरच उलटणार?

शांभवी कियाराला आपल्या जाळ्यात ओढून राजगुरूंचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, अनिकेत आणि छवी आता तिचे खरे रूप बाईआजींसमोर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातच शकुंतलाची सुटका आणि शांभवीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

आता अनिकेत-छवीच्या हाती लागलेला पुरावा शांभवीच्या संपूर्ण खेळाचा पर्दाफाश करणार का? की परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच शांभवी आणखी मोठा डाव खेळणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

Web Title: Marathi serial mi jinkun ghein saara aniket chhavi return shambhavi twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
2

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
3

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
4

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.