Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

'सनई चौघडे', 'कमळी' आणि 'तारिणी' या मराठी मालिकांमध्ये या आठवड्यात मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. जय-शरू, कमळी आणि तारिणीच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 30, 2026 | 12:06 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘सनई चौघडे’मध्ये जय-शरूच्या नात्याला नवं वळण
  • ‘कमळी’मध्ये सरोजच्या मृत्यूचं गूढ उलगडणार?
  • ‘तारिणी’मध्ये प्रेम, गैरसमज आणि तपासाला नवं वळण
मराठी मालिकांच्या प्रेक्षकांसाठी हा आठवडा अनेक धक्कादायक आणि भावनिक घडामोडी घेऊन येणार आहे. प्रत्येक मालिकेच्या कथेत नवे वळण येणार असून काही नाती अधिक घट्ट होतील, तर काहींची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात नेमकं काय घडणार, ते जाणून घेऊया.

‘सनई चौघडे’मध्ये जय-शरूच्या नात्याला नवं वळण

पार्टीत जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगानंतर जय आणि शरू यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. मात्र, एका अनपेक्षित घटनेत जय शरूचा जीव वाचवतो. या घटनेनंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय यावेळी गौतम आणि असावरीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. अंधश्रद्धेला न जुमानता तो त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देताना दिसणार आहे. तसेच मालिकेत वटपौर्णिमेचा विशेष भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कमळी’मध्ये सरोजच्या मृत्यूचं गूढ उलगडणार?

सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिचा मृत्यू होतो. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते आणि तिच्या मृत्यूमागील सत्य शोधण्याची शपथ घेते.

Marathi Serial: ‘राजवाडे, I Love You! स्वानंदीने दिली प्रेमाची कबुली; बायकोच्या आधी समरने केली वटपौर्णिमेची पूजा; पाहा प्रोमो

सत्याच्या शोधासाठी कमळी मुंबईचा प्रवास सुरू करते. या प्रवासात ती केवळ गुन्ह्याचा तपासच करणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळालाही सामोरी जाणार आहे. अनेक रहस्यांचे धागेदोरे उलगडत असताना तिच्यासमोर नवी आव्हाने उभी राहणार असून या आठवड्यात कथेला महत्त्वाचं वळण मिळणार आहे.

Akanksha- Gaurav Khanna Divorce : ‘त्याला मूल हवंय, पण मला नाही’, आकांक्षाने ‘Lock Upp 2’मध्ये उघड केलं नातं तुटण्यामागचं खरं कारण

‘तारिणी’मध्ये प्रेम, गैरसमज आणि तपासाला नवं वळण

केदारने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केल्यामुळे तारिणी आणि त्याच्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र, याच काळात केदार आपल्या मनातील भावना व्यक्त करत तारिणीला प्रेमाची कबुली देतो आणि तिला प्रपोज करतो.

दरम्यान, गुलाबच्या प्रकरणाचा तपास करत असताना तारिणीला आणखी एक मोठा धक्का बसतो. तिचे वरिष्ठ साधू सर यांची बदली झाल्याचं समोर येतं आणि त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या बदलामुळे तपासाची दिशा बदलणार असून तारिणीसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत.

Web Title: Marathi serial update major twists await in sanai chaughade kamali and tarini this week heres what happens next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • marathi serial update
  • serial update

संबंधित बातम्या

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
1

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक
2

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक

Serial Update: ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर स्टार प्रवाहची ‘ही’ मालिका होणार बंद; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत
3

Serial Update: ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर स्टार प्रवाहची ‘ही’ मालिका होणार बंद; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.