(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक रोमँटिक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये समर आणि स्वानंदी यांच्या नात्यातील गोड क्षणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मालिकेत समरने स्वानंदीला प्रपोज केल्याचं पाहायला मिळालं. निकिता आणि आनंद या दोघांनीही समरला लवकरात लवकर मनातल्या भावना स्वानंदीसमोर व्यक्त कर असं सांगितले होते.
समरने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतरही स्वानंदी कोणतंच उत्तर देत नाही. तिच्या शांततेमुळे समर थोडासा निराश होतो. तो भावूक होत स्वानंदीला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तुमच्या मनात माझ्याबद्दल कोणत्याही भावना नसतील… तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.”
समरच्या या शब्दांनंतर स्वानंदीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वटपौर्णिमेच्या दिवशी समर पूजेला येणार का, याची तिला सतत चिंता लागून राहते. मात्र, पूजास्थळी पोहोचल्यावर तिच्यासाठी एक आनंददायी सरप्राइज वाट पाहत असतं.
स्वानंदी तिथे पोहोचते तेव्हा समर आधीच इतर महिलांसह वडाच्या झाडाची पूजा करताना दिसतो. आपल्या लाडक्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी समरने स्वतः पूजा केल्याचं पाहून स्वानंदी भावूक होते आणि तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.
स्वानंदीला नटून-थटून आलेलं पाहून समर प्रेमाने म्हणतो, “तुम्ही माझ्यासाठी उपवास धरलात… तुम्ही माझ्या दीर्घायुष्यासाठी पूजा करणार आहात. मलाही माझी बायको दीर्घायुषी असावी, ती कायम निरोगी राहावी असंच वाटतं… म्हणून मी ही पूजा केली.”
समरच्या या प्रेमळ कृतीमुळे स्वानंदीच्या मनातील भावना अखेर व्यक्त होणार का? ती समरच्या प्रेमाचा स्वीकार करत “राजवाडे, I Love You!” म्हणणार का? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा वटपौर्णिमा विशेष भाग १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समर आणि स्वानंदीच्या नात्यातील हा खास आणि भावनिक क्षण पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
समरच्या या प्रेमळ कृतीमुळे स्वानंदीच्या मनातील भावना अखेर व्यक्त होणार का? ती समरच्या प्रेमाचा स्वीकार करत “राजवाडे, I Love You!” म्हणणार का? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.






