Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सेटवर सुरु झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का ? ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मध्ये रंगणार प्रेमाची अनोखी गोष्ट

'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' ही प्रेम, स्वाभिमान आणि अहंकाराच्या संघर्षातून उभी राहणारी भावनिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या २३ मार्चपासून कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ प्रेक्षकांच्या भेटीस
  • कलर्स मराठीवर रंगणार प्रेमाची अनोखी गोष्ट
  • ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ कधी होणार सुरु?
 

चंदेरी दुनियेचं आकर्षण आणि सोन्याच्या पडद्याची जादू प्रत्येकालाच भुरळ घालते. या झगमगाटामागे दडलेल्या भावना, संघर्ष आणि स्वप्नांची गुंफण उलगडणारी एक वेगळी प्रेमकहाणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ ही नवी मालिका प्रेम, स्वाभिमान आणि अहंकार यांच्या संघर्षातून उभी राहणारी एक भावनिक आणि नाट्यमय कथा सादर करणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने आधीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, आणि उत्सुकता वाढवली आहे.

फिल्मी सेटवर वाढलेली एक साधी, पण जिद्दी मुलगी आणि त्याच इंडस्ट्रीवर राज्य करणारा एक अहंकारी सुपरस्टार अशा दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची ही कथा आहे. मोहिनी ही आयुष्याने खूप काही शिकवलेली, संकटांना तोंड देणारी, बहुआयामी आणि स्ट्रीट-स्मार्ट मुलगी आहे. स्वतःच्या कष्टांवर उभी राहण्याची जिद्द आणि आईचा हरवलेला सन्मान परत मिळवण्याचं स्वप्न हेच तिच्या आयुष्याचं ध्येय आहे.

Zee Natya Gaurav Puraskar 2026: “उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा” दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेल्या मोहिनीच्या आयुष्यात तिची आई शालिनी ही खंबीर स्त्री आहे, जिने कठीण परिस्थितीतून स्वतःला आणि आपल्या मुलींना वाचवत आयुष्य उभं केलं. महेंद्र हा फिल्म इंडस्ट्रीतील ॲक्शन डायरेक्टर तिच्या कुटुंबाचा आधार बनतो. लाईट्स, कॅमेरा आणि मेकअप रूम्समध्ये वाढलेली मोहिनी पुढे जाऊन मेकअप आर्टिस्ट बनते. मात्र, तिच्या आयुष्यात मोठं वळण येतं जेव्हा तिची भेट होते लोकप्रिय आणि अहंकारी सुपरस्टार RK सोबत होते.

RK हा बाहेरून आत्मविश्वासू आणि शक्तिशाली दिसत असला, तरी त्याच्या भूतकाळात अनेक जखमा दडलेल्या आहेत. मोहिनी सन्मान आणि स्वतःची ओळख शोधत असते, तर RK आपल्या अहंकारात गुरफटलेला असतो. त्याच्या पहिल्याच भेटीत निर्माण होणारा संघर्ष हळूहळू एका गुंतागुंतीच्या नात्यात बदलतो. जे कधी सूडाने, कधी भावनांनी, तर कधी प्रेमाच्या वेगळ्या छटांनी भरलेलं आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने दुसरा मुलगा काजूची दाखवली झलक; ‘गोला’ला क्यूटनेसमध्ये दिली टक्कर

या मालिकेत कलाकारांची दमदार कास्ट पाहायला मिळणार आहे. शालिनीच्या भूमिकेत सोनाली पंडित नाईक, महेंद्रच्या भूमिकेत शांतनू मोघे, तर RK म्हणजेच सुपरस्टारच्या भूमिकेत समीर परांजपे दिसणार आहेत. तसेच मोहिनीची भूमिका अनघा ठाकूर साकारत आहे. याशिवाय श्वेता मेहेंदळे आणि सुशील विश्वकर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेबद्दल बोलताना निर्माते आणि टीमने सांगितले की, ही कथा केवळ प्रेमकहाणी नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, संघर्षातून उभं राहण्याचा आणि भावनांच्या गुंतागुंतीचा प्रवास आहे. अभिनेत्री सोनाली पंडित नाईक या दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, त्यांची भूमिका या मालिकेचा एक मजबूत आधार ठरणार आहे.

कलर्स मराठीवर प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांना बॉलीवूडच्या चकाकीमागील गडद वास्तव दाखवणार आहे. विश्वासघात, सूड, स्वाभिमान आणि प्रेम यांसारख्या प्रभावी भावनांचा वेध घेत ही कथा प्रेक्षकांना एका भावनिक रोलरकोस्टरवर घेऊन जाणार आहे. मोहिनी आणि RK यांच्या आयुष्यात नियती कोणते वळण आणणार? अहंकारावर प्रेम मात करणार का? आणि मोहिनी तिचं स्वप्न पूर्ण करू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेतच मिळणार आहे.

Web Title: Mohini premachi filmi kahani marathi serial colors marathi launch on 23 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.