Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina Controversy: समय रैनाच्या ‘त्या’ विनोदावरून नवा वाद; मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलानांनी व्यक्त केली नाराजी

Samay Raina Controversy: ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मधील समय रैनाच्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. चुलत भावाची नवऱ्याशी तुलना केल्याने मौलाना खलील रहमान नूरी यांनी नाराजी व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Samay Raina Controversy: लोकप्रिय कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एक एपिसोड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एपिसोडमध्ये समयने एका स्पर्धक महिलेला उद्देशून केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत असून, मुस्लिम धर्मगुरूंनीही त्यावर आक्षेप घेतला आहे.

नेमकं काय म्हणाला समय रैना?

‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या या एपिसोडमध्ये सलमा देवानी नावाने सहभागी झालेल्या स्पर्धक महिलेशी समय संवाद साधत होता. तिचं खरं नाव भाग्यश्री तारके असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी समयने तिला विचारलं की, ती शोमध्ये कोणासोबत आली आहे का? त्यावर तिने आपण एकटीच मुंबईत आल्याचं सांगितलं. मात्र, मुंबईत राहणारा तिचा एक चुलत भाऊ तिच्यासोबत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

यावेळी पॅनेलवर उपस्थित असलेल्या हुमा कुरेशीने तिला, ‘कोणता चुलत भाऊ?’ असा प्रश्न विचारला. त्यावर समयने लगेचच ‘तो तिचा नवरा असणार’ अशी टिप्पणी केली. समयच्या या विनोदी टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चर्चा झाली. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

A Hyderabadi muslim girl named salama diwani came on India’s got Latent. Samay Raina : “Salama Diwani, who came with you”. Salma said her cousin. Huma Qureshi: “Who is her cousin ?”. Samay Raina : “Husband uske”. https://t.co/sYWuoCQXcF — هارون خان (@iamharunkhan) November 14, 2026

समयच्या वक्तव्यावर मौलाना खलील रहमान नूरी यांचा आक्षेप

समय रैनाच्या या टिप्पणीवर ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमाचे सचिव मौलाना खलील रहमान नूरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आयएएनएसशी बोलताना समयचं वक्तव्य नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं म्हटलं.

ते म्हणाले, “हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. मला वाटत नाही की हे योग्य आहे. तिने अशी टिप्पणी करायला नको होती. ती कोणासोबत आली आहे किंवा नाही, हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. ती तिच्या नवऱ्यासोबत किंवा इतर कोणासोबत आली आहे, असं म्हणणं अजिबात योग्य नाही.”

Mumbai, Maharashtra: Islamic scholar Maulana Khalil ur Rehman Nuri says, “This is an inappropriate remark and something that can vitiate the atmosphere. Filing FIRs against each other also creates an atmosphere of hostility. A trend has emerged in the name of publicity: first, do something controversial, then face a case, apologise afterwards and finally get the matter settled.” — IANS (@ians_india) November 14, 2026

प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्यांचा ट्रेंड? मौलानांनी व्यक्त केली नाराजी

मौलाना खलील रहमान नूरी यांनी पुढे या प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडू शकतं, अशी चिंता व्यक्त केली. तसेच एकमेकांविरोधात एफआयआर दाखल केल्याने वैर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा एक ट्रेंडच झाला आहे. आधी काहीतरी वादग्रस्त करा, मग खटल्याला सामोरं जा, त्यानंतर माफी मागा आणि शेवटी प्रकरण मिटवा.”

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

सोशल मीडियावर समय रैनाच्या वक्तव्याची चर्चा

समय रैनाने केलेली ही टिप्पणी मुस्लिम समाजात चुलत भावंडांच्या लग्नाबाबत असलेल्या रूढीवादी कल्पनांशी जोडली जात आहे. स्पर्धक महिला मुस्लिम पात्र साकारत असल्यामुळे या विनोदावर विशेष चर्चा सुरू झाली आहे. शोमधील रोस्ट-कॉमेडीच्या स्वरूपात करण्यात आलेली ही टिप्पणी आता सोशल मीडियावर टीकेचा विषय ठरत आहे. त्यामुळे समय रैना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी! दहाव्या दिवशी रणबीरच्या सिनेमाने मोडला ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड

Web Title: Samay raina controversy cousin husband joke muslim community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Samay Raina
  • Social Media

संबंधित बातम्या

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
1

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी! दहाव्या दिवशी रणबीरच्या सिनेमाने मोडला ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड
2

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी! दहाव्या दिवशी रणबीरच्या सिनेमाने मोडला ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
4

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.