
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पृथ्वीक प्रताप आपल्या मित्रांसोबत रोड ट्रिपला गेला होता. रात्रीच्या वेळी डोंगर आणि वाहतं पाणी अशा परिसरातून तो आणि त्याचा मित्र पुढे जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचदरम्यान पृथ्वीकला एका ठिकाणी दूरवर आगीच्या ज्वाळा धगधगत असल्याचं दिसतं.
हे दृश्य पाहून पृथ्वीक कॅमेरा त्या दिशेने करत चाहत्यांना ते दृश्य दाखवतो. “मित्रांनो, मी आणि माझा मित्र एका ठिकाणी रोड ट्रिप करत आलो. या ठिकाणी आम्हाला काहीतरी दिसलं आहे. मी दाखवतो, थांबा,” असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो.
जवळ गेल्यावर नेमकं काय दिसलं?
व्हिडीओमध्ये दूरवरून ज्वाळा पेटलेल्या दिसत असल्या तरी, त्या ठिकाणी जवळ गेल्यानंतर वेगळंच चित्र पाहायला मिळतं. पृथ्वीक आणि त्याचे मित्र नदीतून वाट काढत त्या दिशेने पुढे जातात.
“आम्ही तिथे जवळ जाऊन तिथे काय आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, हा रस्ता आहे. आम्ही फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं पृथ्वीक सांगतो.
मात्र, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पृथ्वीक आणि त्याचे मित्र अचानक तिथून पळत परत येताना दिसतात. त्या ठिकाणी नेमकं काय होतं किंवा त्यांनी काय पाहिलं, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
पृथ्वीकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. “नेमकं काय होतं तिकडे?”, “जागा कुठली आहे?” अशा कमेंट्स करत अनेकांनी पृथ्वीकला त्या ठिकाणाबद्दल विचारलं आहे.
तर एका चाहतीने, “मीसुद्धा किती घाबरत घाबरत बघत होते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, पृथ्वीक आणि त्याच्या मित्रांना त्या ठिकाणी नेमकं काय दिसलं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.