Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग

Gia & Gauri New Webseries: अभिनेत्री रितिका श्रोत्री पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जिया आणि गौरी’ या नव्या वेबसीरिजमध्ये ती एकाच वेळी दोन व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 14, 2026 | 05:12 PM
Gia & Gauri New Webseries: ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Gia & Gauri New Webseries: ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रितिका श्रोत्री साकारणार दुहेरी भूमिका
  • ‘जिया’ आणि ‘गौरी’ या व्यक्तिरेखा स्वभावाने पूर्णपणे वेगळ्या
  • नवी वेबसीरिज रितिकासाठी ठरणार अभिनयाचं मोठं आव्हान
Jiya Ani Gauri New Web Series: अभिनेत्री रितिका श्रोत्रीने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. आता ती पुन्हा एकदा काहीतरी वेगळं घेऊन येत आहे. ‘जिया आणि गौरी’ या नव्या वेबसीरिजमध्ये रितिका एकाच वेळी दोन व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलींचे स्वभाव, विचार आणि जगण्याची पद्धत एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे रितिकासाठी ही भूमिका केवळ अभिनयाची संधी नसून स्वतःला नव्या पद्धतीने आजमावण्याचं आव्हानही आहे.

वेबसीरिज कधी येणार?

ही वेबसीरिज १५ ऑगस्टपासून ‘भडांग टीव्ही’च्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा दोन फ्लॅटमेट्सच्या आयुष्याभोवती फिरते. पुण्याहून मुंबईत आलेली गौरी आणि कोलाब्यातील जिया एकाच घरात राहतात. घर एक असलं तरी दोघींचं जग मात्र वेगळं आहे. त्यांच्या सवयी, मतं, बोलण्याची पद्धत आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात सतत फरक जाणवतो. याच विसंगतीतून अनेक मजेशीर प्रसंग तयार होतात. Gia & Gauri New Webseries:

एकाच अभिनेत्रीच्या दोन वेगळ्या

रितिकाने जियाची आणि गौरीची व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्यातील फरक फक्त संवादांपुरता मर्यादित ठेवलेला नाही. चालण्याची ढब, चेहऱ्यावरचे भाव, बोलताना वापरलेली लकब आणि छोट्या गोष्टींवर व्यक्त होण्याची पद्धत यावरही तिने बारकाईने काम केलं आहे. त्यामुळे पडद्यावर एकाच अभिनेत्रीच्या दोन वेगळ्या व्यक्ती पाहायला मिळणार आहेत.

दुहेरी भूमिका साकारताना कलाकाराला सतत एका व्यक्तिरेखेतून दुसऱ्या व्यक्तिरेखेत जावं लागतं. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान रितिकासमोरही अशीच परिस्थिती होती. एका पात्राचा प्रसंग पूर्ण केल्यानंतर लगेच दुसऱ्या पात्रासाठी वेशभूषा आणि रूप बदलून कॅमेऱ्यासमोर यावं लागायचं. ही प्रक्रिया थकवणारी असली तरी रितिकासाठी ती तितकीच मजेदार आणि शिकवणारी ठरली.

मालिका विनोद अधिक रंगतदार

या मालिकेत रितिकासोबत अभिनय बेर्डे, भार्गवी चिरमुले, रुमानी खरे आणि सुनील अभ्यंकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. विनोदी कथेत कलाकारांमधील संवाद आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या सगळ्या कलाकारांचा एकत्रित अभिनय मालिकेचा विनोद अधिक रंगतदार करण्याची शक्यता आहे.

‘जिया आणि गौरी’ रितिकासाठी आणखी एका कारणामुळे खास आहे. यावेळी ती केवळ अभिनेत्री म्हणून काम करत नसून मालिकेच्या कल्पनेच्या निर्मितीतही सहभागी झाली आहे. लेखक-दिग्दर्शक गौरव बर्वे यांच्यासोबत तिने या संकल्पनेवर काम केलं आहे. त्यामुळे आपल्या मनातली कल्पना प्रत्यक्ष पडद्यावर आणण्याचा अनुभव तिला मिळाला आहे.

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

बालवयापासून अभिनयाला सुरुवात

रितिकाने बालवयापासून अभिनयाला सुरुवात केली. ‘बकेट लिस्ट’, ‘बॉईज’, ‘टकाटक’, ‘डार्लिंग’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ आणि ‘रेड २’ यांसारख्या विविध प्रोजेक्ट्समध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. आता अभिनयासोबतच क्रिएटिव्ह कामाकडेही ती वळताना दिसत आहे.

‘जिया आणि गौरी’नंतर रितिकाचे आणखी तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तिने या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं असून, हिंदी आणि इंग्रजीतील तिच्या ‘द लाईट कॅचर’ या सोलो प्लेचे प्रयोगही सुरू आहेत.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! या नात्याचं गूढ उलगडताच, होणार मोठा खुलासा!

दोन भिन्न मुलींची गंमत, त्यांच्यातील सततची खटकेबाजी आणि मुंबईतल्या रोजच्या आयुष्याची झलक यामुळे ‘जिया आणि गौरी’ ही मालिका किती रंगतदार ठरते, हे १५ ऑगस्टनंतरच स्पष्ट होईल. मात्र रितिकाचा हा नवा प्रयोग आणि पडद्यामागच्या निर्मितीतील तिचा सहभाग यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

 

Web Title: Ritika shrotri to play double role in new web series jiya ani gauri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन
1

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
2

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा
3

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
4

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.