फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री रितिका क्षोत्री नुकतेच एका हिंदी सिनेमात मोठ्या पडद्यावर झळकली होती. ‘रेड २’ सिनेमा प्रेक्षकांच्या फार पसंतीस आला होता. या सिनेमामध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असून त्याचसह अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री वाणी कपूरही दिसून आली होती. दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से रितिकाने एका मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यात तिने रितेशचे मनभरून कौतुक केले आहे.
रितिकाने रितेशसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिचे असे म्हणणे आहे की तिला रितेशसोबत काम करण्याची फार उत्सुकता होती. तशी ती रितेशची फार मोठी चाहतीही आहे. सिनेमाच्या शूटिंग सुरु होण्या अगोदर अभिनेत्रीने एक ऑडिशन दिले होते, ज्यात तिची निवड झाली होती. त्यांनतर तिला ५ ते ६ दिवसांसाठी लखनऊला बोलवण्यात आले होते. रितिकाने त्यासाठी फार तयारीही केली होती. इतक्या मोठ्या अभिनेत्यांसोबत तिला काम करण्याची संधी मिळत होती त्यामुळे ती फार उत्सुक होती.
दरम्यान, रितेशबरोबर केलेल्या कामाचे अनुभव तिने शेअर करताना सांगितले की, “रितेश सर सगळ्यांशी अगदी आदराने बोलतात. सगळयांना अहो-जाओ करतात. आमचे सीन सुरू होते. दोघांचे वाईड सीन शूट झाले आणि मग रितेश सरांचा क्लोज सीन शूट करण्यात आला. शूटिंग दरम्यान, इतरांच्या क्लोज सीनवेळी इतर कुणी थांबत नाही. पण ते माझ्यासाठी माझा क्लोज सीन शूट होईपर्यंत थांबले होते आणि ते क्षण माझ्यासाठी फार स्पेशल होते.”
हे सांगताना रितिका पुढे म्हणते की,”मग अजय सरांसोबत माझा चार मिनिटांमध्ये एक सीन शूट झाला. फार लवकर आम्ही अगदी एकाच टेकमध्ये ते शूट पूर्ण केले. त्यावेळी तीन दिवसांसाठी क्लायमॅक्स शूट होत होता आणि जवळजवळ पंधराशे लोकं त्या ठिकाणी उपस्थित होते. मी हे पाहून फार भारावले होते.