Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

आषाढी एकादशीनिमित्त 'सन मराठी'ने 'इच्छा कलश' हा अनोखा उपक्रम राबवला आहे. सीड पेपरवर लिहिलेल्या भक्तांच्या इच्छा पंढरपुरात पोहोचवल्या जाणार असून, सान्वी जांभेकरही या भक्तिमय उपक्रमात सहभागी होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 02:20 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीनामात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत असताना, विविध कारणांमुळे वारीत सहभागी होऊ न शकलेल्या भाविकांसाठी ‘सन मराठी’ वाहिनीने एक अनोखा आणि अर्थपूर्ण उपक्रम राबवला आहे.

देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरील विविध गावांमध्ये ‘इच्छा कलश’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भाविकांना सीड पेपर (बियायुक्त कागद) दिला जात असून, त्यावर ते आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना किंवा विठुरायाबद्दलच्या भावना लिहित आहेत. त्यानंतर हे सीड पेपर विशेष ‘इच्छा कलशात’ जमा केले जात असून, ते पंढरपूरच्या पवित्र भूमीत पोहोचवले जाणार आहेत.

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

या भक्तिमय उपक्रमात ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांभेकर देखील सहभागी होणार आहे. ती पंढरपुरात जाऊन विठुरायाची महापूजा करणार असून, या अनुभवाबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे.

सान्वी म्हणाली, “‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेमुळे मला पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्याची संधी मिळत आहे. ‘इच्छा कलश’ हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. ज्यांना वारीत सहभागी होता आलं नाही, त्यांच्याही भावना विठुरायापर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे. वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि समर्पण मला नेहमीच प्रेरणा देतं. आता प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

या उपक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वापरण्यात आलेला सीड पेपर पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. वारीनंतर या कागदांची लागवड केली जाणार असून, त्यातून नवीन रोपे उगवतील. अशा प्रकारे भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा ‘सन मराठी’चा हा उपक्रम सध्या विशेष चर्चेत आहे.

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

Web Title: Sun marathi unique initiative devotees wishes to reach lord vitthal through the iccha kalash campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
1

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
2

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट
3

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क
4

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.