
Salim Kodathur Health News: (सौजन्य- सोशलमीडिया)
Saleem Kodathoor: गायक आणि संगीतकार सलीम कोडाथूर यांना 10 वर्षांपूर्वी एका मित्राच्या सल्ल्यावरून फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे गंभीर युरिनरी इन्फेक्शन झालं. यानंतर काहीच महिन्यांत त्यांच्या पापण्यांवर आणि पायांवर सूज आली तसेच त्यांची इम्युनिटी पण कमी झाली.
सलीम यांनी सांगितलं की, शरीरातलं अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे ही अडचण आली होती. शरीरातलं हे प्रोटीन असंच कमी होत राहिलं तर किडनी निकामी होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. Salim Kodathur Health News:
किडनीच्या बायोप्सीनंतर त्यांना ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी’ हा आजार झाल्याचं कळलं असं त्यांनी सांगितलं. याच्या उपचारासाठी त्यांना कित्येक महिने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. सलीम यांनी सांगितलं की, त्यांनी ही क्रीम 500 रुपयांना घेतली होती आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ तिचा वापर केला.
पण आरोग्याच्या अडचणी अजूनही त्यांना त्रास देतायत, खासकरून झोपेच्या तक्रारी. “मी दिवसातून फक्त दोन-तीन तासच झोपू शकतो. काही वेळा तर मला झोप येण्यासाठी औषध घ्यावं लागतं” असं त्यांनी म्हटलं.
असाच आजार एका 17 वर्षांच्या एका मुलीलाही झाला होता, जिने फेअरनेस क्रीमचा वापर केला होता. मलप्पुरम इथल्या अॅस्टर MIMS मदर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, त्या मुलीने इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचे प्रमोशनल व्हिडीओ बघून ही क्रीम मागवली होती. या क्रीममुळे पिंपल्स, डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन दूर होतात, असा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता.
त्यानंतर मुलीला आरोग्याच्या बऱ्याच अडचणी झाल्या, असं त्या मुलीने सांगितलं. तिचं ब्लड प्रेशर अचानक खाली आलं आणि ती बेशुद्ध पडली. तसेच, तिच्या पायांवर इतकी सूज आली की तिला चालणं-फिरणं आणि पायऱ्या चढणं कठीण झालं, ज्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.
सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनाही अशीच काही लक्षणं जाणवली, ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले. त्यामुळे त्यांना आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, त्यांना पैशांचं नुकसान पण सहन करावं लागलं.
सलीम यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ पण शेअर केला, जो सध्या वेगाने व्हायरल होतोय.म्हणूनच इन्फ्लुएन्सरच्या सांगण्यावरून कोणतीही क्रीम चेहऱ्याला लावण्याआधी दहा वेळा विचार करा. गोरेपणाच्या नादात आरोग्य गमावून बसाल, हे या दोन्ही घटनांमधून कळतं.