Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपर डुपर’मधील ‘कुकडू कू’ गाण्याची धूम! पारंपरिक-आधुनिक कुटुंबांच्या जुगलबंदीने रंगणार मनोरंजनाचा जल्लोष

‘सुपर डुपर’ हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा कुटुंबांच्या जुगलबंदीने रंगणार असून, चाहत्यांचे भरभरून मनोरंजन होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 25, 2026 | 08:47 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सुपर डुपर’मधील ‘कुकडू कू’ गाण्याची धूम
  • कुटुंबांच्या जुगलबंदीने रंगणार मनोरंजनाचा जल्लोष
  • ‘सुपर डुपर’ कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कुकडू कू’ असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त ऊर्जा, मजा आणि गोंधळाचा तडका घेऊन आलं असून सोशल मीडियावरही याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

समीर आशा पाटील यांच्या खास शैलीतील बोल आणि अभिनय जगताप यांच्या जोशपूर्ण संगीताची साथ लाभलेलं हे गाणं अंशुमन मोरे आणि लहान मुलांच्या निरागस, उत्साही आवाजात साकारलं आहे. गाण्याची सुरुवात होताच त्याची लय आणि बीट्स प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडतात. पारंपरिक आणि आधुनिक कुटुंबांमधील मजेशीर संघर्ष, त्यांची जुगलबंदी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ या सगळ्याच गोष्टी अत्यंत रंगतदार पद्धतीने या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत.

गोलमाल ५’बाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा; फिल्म साइन करण्यामागचं सांगितलं कारण, अजय देवगणबद्दलही केलं महत्त्वपूर्ण विधान

‘कुकडू कू’ हे गाणं केवळ ऐकण्यासाठीच नव्हे, तर पाहण्यासाठीही एक व्हिज्युअल ट्रीट ठरत आहे. रंगतदार सेट्स, भन्नाट कोरिओग्राफी आणि प्रत्येक कलाकाराचा उत्साही परफॉर्मन्स यामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. चित्रपटाच्या कथानकातील ‘गोंधळ’ हा महत्त्वाचा भाग या गाण्यातून प्रभावीपणे समोर येतो. दोन भिन्न विचारसरणीच्या कुटुंबांची टक्कर, त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग आणि आनंदी वातावरण यामुळे गाणं अधिकच एंटरटेनिंग बनलं आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, “हे गाणं आमच्या ‘सुपर डुपर’ चित्रपटाचा खरा उर्जाबिंदू आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना तो आवडेल, याची आम्ही काळजी घेतली आहे. विशेषतः लहान मुलांनाही या गाण्याशी जोडता यावं, यासाठीच आम्ही हे गाणं एका लहान मुलाकडून गाऊन घेतलं. अंशुमन मोरे हा जळगावमधील अत्यंत साध्या घरातील मुलगा आहे आणि त्याने आपल्या पहिल्याच गाण्यातून अप्रतिम कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की, चित्रपटगृहात हे गाणं लागल्यानंतर प्रेक्षक खुर्चीत बसून राहणार नाहीत, तर ते या जल्लोषात नक्कीच सहभागी होतील.”

Dhurandhar 2’मध्ये ‘शिरानी बलोच’ कोण? रहस्यमय पात्रामुळे वाढला सस्पेन्स;कुणावर आधारित आहे ही भूमिका?

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीतून साकारलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब पाहण्यासाठी हा एक परफेक्ट एंटरटेनर ठरणार असल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. समीर आशा पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे. एकूणच, ‘कुकडू कू’ या गाण्याच्या माध्यमातून ‘सुपर डुपर’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा गोंधळ, धमाल आणि मनोरंजनाचा जल्लोष प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Super duper marathi movie kukdu koo song launch movie release on 3 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
2

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Tumbadchi Manjula OTT Release: ‘तुंबाडची मंजुळा’चा ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर; ‘या’ दिवसापासून पाहता येणार ब्लॉकबस्टर चित्रपट
3

Tumbadchi Manjula OTT Release: ‘तुंबाडची मंजुळा’चा ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर; ‘या’ दिवसापासून पाहता येणार ब्लॉकबस्टर चित्रपट

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
4

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.