
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
स्वरदाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वरदा आणि तिचा पती आपल्या चिमुकल्या लेकीकडे आनंदाने पाहताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील या नव्या पर्वाबद्दल भावुक पोस्ट लिहिली आहे.
“प्रत्येक दिवशी दोघांना निवडणं, हीच कहाणी गेल्या काही काळापासून आमच्या आयुष्यात सुरू होती. आता आमची कहाणी एका सुंदर अशा नवीन अध्यायाने सुरू होत आहे. या छोट्या पाहुणीमुळे आमच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला आहे. २० सप्टेंबर रोजी आमच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे, जिच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद लाभला आहे. सर्वांना डॉटर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!” असं स्वरदाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
स्वरदाने ही गोड बातमी शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडिया कमेंट्समधून चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनीही स्वरदा आणि तिच्या कुटुंबाचं अभिनंदन केलं आहे. लेकीच्या आगमनामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू झालं आहे.
स्वरदा ठिगळेने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम केलं आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर स्वरदाने तिची जागा घेतली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे स्वरदा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि तिची मोठी फॅन फॉलोइंग निर्माण झाली.
आता अभिनयासोबतच स्वरदाच्या आयुष्यात आई म्हणून एक नवी जबाबदारी आली आहे. Daughters Dayच्या खास दिवशी तिने दिलेली ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांसाठीही खास ठरली आहे.