Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Tarini Serial: ‘तारिणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! देशाच्या सुरक्षेसाठी तारिणीवर ‘ऑपरेशन तिरंगा’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात पाहा या मिशनचा थरार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 01:38 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tarini Serial: ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ आपल्या दमदार कथानकामुळे सातत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अंडरकव्हर कॉप म्हणून तारिणीने आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करत सत्य समोर आणलं आहे. आता तिच्यासमोर देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी आणि धोकादायक जबाबदारी येणार आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ या विशेष मोहिमेची जबाबदारी तारिणीवर सोपवण्यात आली आहे.

‘ऑपरेशन तिरंगा’ची जबाबदारी तारिणीवर

तारिणीने आतापर्यंत आपल्या धाडस आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कठीण प्रकरणांचा छडा लावला आहे. मुलांच्या अपहरणाचं प्रकरण असो, बनावट पनीर घोटाळ्याचा पर्दाफाश असो किंवा कॉलेजमधील ड्रग्ज तस्करीचा तपास असो, प्रत्येक वेळी तिने आव्हान स्वीकारून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

तिच्यासाठी न्याय, सत्य आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा नेहमीच सर्वोच्च राहिली आहे. त्यामुळे संकट कितीही मोठं असलं तरी त्याचा सामना करण्यासाठी तारिणी कायम सज्ज असते.

कर्तव्य आणि कुटुंबाचा साधला समतोल

एकीकडे अंडरकव्हर कॉप म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना तारिणीने दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. आदर्श मुलगी, नात आणि पत्नी म्हणून ती आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या मनापासून निभावताना दिसली आहे.

कर्तव्य आणि कुटुंब यांचा समतोल साधत तारिणीने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे. मात्र, आता तिच्यासमोरचं आव्हान पूर्वीपेक्षा खूप मोठं असणार आहे.

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

देशाला वाचवण्यासाठी तारिणीला कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार?

‘ऑपरेशन तिरंगा’ या मिशनसाठी तारिणीची निवड करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेचं नेमकं स्वरूप काय आहे, देशाला वाचवण्यासाठी तिला कोणत्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे आणि या मिशनसाठी तिला कुठे पाठवलं जाणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तारिणी ही मोहीम एकटीच पूर्ण करणार की तिच्यासोबत काही खास व्यक्ती असणार, याचीही उत्सुकता आहे. आगामी भागांमध्ये या मिशनमागचं रहस्य उलगडणार आहे.

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार

स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात रंगणार थरार

‘ऑपरेशन तिरंगा’च्या निमित्ताने तारिणीच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होणार आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित हे मिशन तिच्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमांपेक्षा अधिक मोठं आणि थरारक असणार आहे.

स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात ‘ऑपरेशन तिरंगा’ची सुरुवात आणि त्यामागचं रहस्य पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तारिणी या मिशनमध्ये कोणती नवी आव्हानं स्वीकारणार आणि देशासाठीची ही मोहीम कशी पूर्ण करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Tarini serial operation tiranga independence day special week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Independence Day
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Har Ghar Tiranga 2026: तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!
1

Har Ghar Tiranga 2026: तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
2

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

Bollywood Actresses : डान्स नंबर ठरले करिअरचा टर्निंग पॉइंट; राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेहीचा खास प्रवास
3

Bollywood Actresses : डान्स नंबर ठरले करिअरचा टर्निंग पॉइंट; राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेहीचा खास प्रवास

Indian Independence Facts: १५ ऑगस्टची ‘ही’ १५ ऐतिहासिक तथ्ये प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असलीच पाहिजेत
4

Indian Independence Facts: १५ ऑगस्टची ‘ही’ १५ ऐतिहासिक तथ्ये प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असलीच पाहिजेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.