Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…

Tejaswini Lonari: मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आई-बाबा झाले आहेत. लेकाच्या जन्मानंतर तेजस्विनीने पहिली भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 11:48 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tejaswini Lonari: मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि तिचे पती समाधान सरवणकर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. २२ ऑगस्ट रोजी तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. हि आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून तेजस्विनी आणि समाधानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता आई झाल्यानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनीने या पोस्टमध्ये तिच्या आणि समाधानच्या आयुष्यातील बाळाच्या आगमनापूर्वीचे काही खास क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्यांच्या प्रेमळ आठवणींची झलक पाहायला मिळते. त्यासोबतच अभिनेत्रीने या खास प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“फक्त आम्ही दोघंच…”

ही पोस्ट शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, “फक्त आम्ही दोघंच… आणि आमच्या दोघांच्या मध्ये वाढत होती एका छोट्याशा, पण खूप मोठ्या प्रेमकहाणीची सुरुवात. आमचा हा खास दिवस… आमचा प्रवास, आमचं प्रेम, आमची कुटुंबं आणि आमचं आयुष्य आणखी सुंदर बनवण्यासाठी येणारं ते छोटंसं जीव… या सगळ्याचा आनंद साजरा करणारा.”

तिने पुढे लिहिलं, “आता हे फोटो पाहताना हा क्षण आणखी खास वाटतोय… कारण त्यावेळी आम्ही फक्त दोघंच होतो. आम्ही लवकरच भेटणार असलेल्या आमच्या छोट्या मुलाची स्वप्नं पाहत होतो. मात्र, त्याच्या येण्याने आमच्या मनात प्रेम किती वाढणार आहे, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.”

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड

“दोघांपासून तिघांपर्यंतचा हा प्रवास…”

तेजस्विनीने आपल्या पोस्टच्या शेवटी या नव्या नात्याबद्दल भावना व्यक्त करत म्हटलं, “दोघांपासून तिघांपर्यंतचा हा प्रवास… आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय आहे.” तिची ही भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांकडूनही या नव्या पालकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

तेजस्विनी आणि समाधान यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या खास आठवणींमधून त्यांच्या आयुष्यातील हा सुंदर बदल किती खास आहे, याचीच झलक पाहायला मिळते.

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी

Web Title: Tejaswini lonari first post after becoming a mother marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • newborn baby
  • Tejaswini Lonari

संबंधित बातम्या

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड
1

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी
2

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: आदित्य-अनुष्का झाले आई-बाबा; जुळ्या मुलींच्या आगमनाने घरात दुहेरी आनंद, लेकींची नावंही ठरली
3

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: आदित्य-अनुष्का झाले आई-बाबा; जुळ्या मुलींच्या आगमनाने घरात दुहेरी आनंद, लेकींची नावंही ठरली

Asim Riaz- Himanshi Khurana: असीम रियाजने धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर सोडलं मौन; हिमांशी खुराना आणि पारस छाबडावर साधला निशाणा
4

Asim Riaz- Himanshi Khurana: असीम रियाजने धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर सोडलं मौन; हिमांशी खुराना आणि पारस छाबडावर साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.