Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या बाळाचा जन्म होताच मृत्यू झाला... कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, प्रशासनाचा दावा वेगळाच आहे—बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 05, 2026 | 05:01 PM
नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • वाशी मनपा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यूवरून कुटुंबीयांचा गोंधळ
  • डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कुटुंबीयांचा आरोप
  • बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा
 

वाशी : नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यूवरून मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर बाळ मृत अवस्थेत जन्मल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास

प्रसूतीसाठी १ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मिलन दास यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी वाशी मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही त्यांची पहिलीच प्रसूती होती. ४ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी सुरुवातीला सामान्य प्रसूतीचा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही प्रसूती यशस्वी न झाल्याने अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर बाळाचा जन्म झाला. मात्र, बाळ मृत असल्याचे आढळून आल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा आरोप

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. संबंधित डॉक्टर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष

रुग्णालय प्रशासनाचा वेगळा दावा

दरम्यान, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या माहितीनुसार, बाळाचा गर्भातच दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टर रुग्णासोबतच होते आणि उपचारादरम्यान त्यांनी रुग्णाला सोडून कुठेही पळ काढला नाही, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Vashi municipal hospital newborn baby death family alleges negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Medical
  • Medical Issue
  • Navi Mumbai case
  • Navi Mumbai Crime
  • newborn baby

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.