Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका

मराठी मनोरंजनसृष्टीत पडद्यावर साकारलेली काही नाती मालिकेच्या समाप्तीनंतरही कायम राहतात. उमेश जगताप आणि मिताली मयेकर यांचं नातं त्यापैकीच एक आहे. ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत उमेश यांनी मितालीच्या कस्तुरी या भूमिकेसोबत वडिलांची भूमिका साकारली होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 08, 2026 | 05:39 PM
अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘लाडाची मी लेक गं’मध्ये उमेश जगताप यांनी मिताली मयेकरच्या वडिलांची भूमिका साकारली.
  • मालिकेच्या सेटवर निर्माण झालेला जिव्हाळा आजही कायम आहे.
  • पडद्यावरील वडील-मुलीचं नातं खऱ्या आयुष्यातही खास बंधात बदललं.
 

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: मराठी मनोरंजनसृष्टीत काही नाती अशी असतात, जी मालिकेचा शेवट झाला तरी संपत नाहीत. कॅमेऱ्यासमोर साकारलेली नाती कधी कधी कलाकारांच्या मनात इतकी घर करून जातात की ती आयुष्यभर टिकतात. उमेश जगताप आणि मिताली मयेकर यांचं नातं याचं सुंदर उदाहरण आहे.

‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत उमेश जगताप यांनी मितालीच्या कस्तुरी या भूमिकेसोबत उमेश यांनी तिच्यासोबत वडिलांची भूमिका केली होती. सुरुवातीला ही फक्त अभिनयाची गरज होती. मात्र, मालिकेचं काम पुढे जात असताना दोघांमध्ये छान जिव्हाळा निर्माण झाला. सेटवरचं हे नातं नंतर खऱ्या आयुष्यातही कायम राहिलं.

मितालीसाठी उमेश झाले खास

मितालीनेही उमेश यांना केवळ मालिकेतील वडील म्हणून पाहिलं नाही. तिने त्यांना आपल्या खऱ्या आयुष्यात वडिलांसारखं स्थान दिलं. शूटिंग संपल्यानंतर कलाकार आपापल्या कामात व्यस्त होतात, पण काही नाती मात्र तिथेच थांबत नाहीत. उमेश आणि मिताली यांचं नातं त्यापैकीच एक ठरलं. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचा दिवस या नात्याला एक वेगळीच उंची देणारा ठरला. आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी मितालीने उमेश यांना एक खास जबाबदारी दिली. तिच्या खऱ्या वडिलांसोबत उमेश जगताप यांनीही तिचं कन्यादान केलं.

मितालीचीच होती इच्छा

उमेश यांनी एका मुलाखतीत या आठवणीबद्दल सांगितलं होतं. मितालीचं लग्न ठरल्यावर तिने स्वतः उमेश यांच्याकडे कन्यादान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा क्षण केवळ एका कलाकाराच्या लग्नातील विधी नव्हता, तर स्वतःच्या मुलीच्या आयुष्यातील मोठा प्रसंग असल्यासारखा होता.

स्वतःची मुलं नसली तरी…

उमेश यांनी सांगितलं की, त्यांना स्वतःची मुलं नाहीत. मात्र, त्यांच्या भावाची दोन मुलं आहेत आणि त्यांनी त्या दोघांना नेहमीच आपल्या मुलांसारखं प्रेम दिलं. त्यामुळे मितालीसोबत तयार झालेलं नातंही त्यांच्यासाठी खूप भावनिक आहे. अभिनयाच्या निमित्ताने भेटलेली ही मुलगी पुढे त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनली. कलाकार भूमिका करतात, संवाद बोलतात आणि कॅमेरा बंद झाला की सगळं मागे राहतं. पण कधी कधी त्या भूमिकांमधून तयार झालेल्या भावना मात्र मनात राहतात. मिताली आणि उमेश यांच्या बाबतीतही असंच झालं. मालिकेतील बाप-लेकीचं नातं प्रत्यक्ष आयुष्यातही तितकंच घट्ट झालं.

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…

कन्यादानाचा अनुभव ठरला अविस्मरणीय

उमेश यांच्यासाठी हा अनुभव विशेष होता. स्वतःची मुलगी नसतानाही एका मुलीच्या लग्नात तिचं कन्यादान करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातही ती मुलगी म्हणजे आपल्याशी आधीपासून भावनिक नातं जोडलेली मिताली होती. त्यामुळे त्या दिवसाची आठवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली. मनोरंजनविश्वात प्रसिद्धी, शूटिंग आणि स्पर्धा यांच्यासोबत माणुसकीची अनेक नातीही तयार होतात.

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

उमेश आणि मिताली यांची गोष्ट त्याचं साधं उदाहरण आहे. एका मालिकेत साकारलेली भूमिका इतकी मनापासून जगली गेली की तिचं नातं पडद्याबाहेरही टिकून राहिलं. आजही या बाप-लेकीच्या नात्यातील आपुलकी अनेकांसाठी भावणारी आहे.

Web Title: Umesh jagtap and mitali mayekars father daughter bond continues beyond ladachi mi lek ga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi newss
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
1

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
2

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.