Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Star Pravah Serial: स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेचा प्रवास आता संपला आहे. सुमारे 11 महिन्यांच्या प्रवासानंतर मालिकेने 280 एपिसोड पूर्ण केले असून, मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मालिकेच्या शेवटाची माहिती दिली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 05:47 PM
Star Pravah Serial(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Star Pravah Serial(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 280 एपिसोड पूर्ण
  • मिलिंद गवळींची पोस्ट
  • 11 ऑक्टोबरला शेवट
 

सध्या टीव्हीवर नवीन मालिकांची गर्दी झाली आहे. प्रत्येक चॅनेलला आपली मालिका टीआरपीमध्ये वर राहावी म्हणून रोज नवनवीन काहीतरी करावं लागतं. प्रेक्षकांना कथा आवडली तर मालिका वर्षानुवर्षे चालते, नाहीतर काही महिन्यातच बंद होते. अशातच स्टार प्रवाहच्या एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायचा निर्णय घेतला आहे. ही बातमी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर मालिकेत मुख्य भूमिकेच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यानेच दिली आहे. Star Pravah Serial:

‘वचन दिले तू मला’ चा प्रवास संपला

साधारण 11 महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहवर ‘वचन दिले तू मला’ ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेत अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत हे मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी यांनी खलनायकाची भूमिका केली होती. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.आता मिलिंद गवळी यांनीच सोशल मीडियावर पोस्ट टाकून मालिका संपत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळी काय म्हणाले?

मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं आहे की, “कालचा शेवटचा दिवस होता, संपला ‘वचन दिले तू मला’ या मालिकेचा प्रवास. काल रात्री आम्हा कलाकारांसाठी हा प्रवास संपला. एक अध्याय संपला. 280 एपिसोड पूर्ण करून आम्ही थांबलो. जवळजवळ 11 महिन्यांचा हा प्रवास फारच भारी होता.”ते पुढे म्हणाले की ही मालिका स्टार प्रवाह आणि सेव्हन्थ सेन्स मीडियाने बनवली होती. ही कथा होती वकिलांच्या घराण्याची, जहागीरदार कुटुंबाची. या कुटुंबात मी हर्षवर्धन जहागीरदार नावाच्या एका मोठ्या वकिलाचं पात्र गेल्या 11 महिने जगत होतो.

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

या मालिकेमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. भारतीय संविधान, फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, करार कायदा, मालमत्ता कायदा, कुटुंब कायदा, कंपनी कायदा, कामगार कायदा, पुरावा कायदा… इतके सगळे कायदे मी या मालिकेमुळे शिकलो.त्यांनी एक किस्सा पण सांगितला. ते म्हणाले, मी ग्रॅज्युएशननंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, पण मधेच सोडून दिलं.

पण माझ्या नशिबात कायद्याचा अभ्यास होताच आणि तो या मालिकेच्या निमित्ताने झाला. माझे वडील पोलीस खात्यातून निवृत्त झाले असल्यामुळे घरात तसं वातावरण होतंच. पण खरंच खूप मजा आली ही मालिका करायला. शेवटी त्यांनी दिग्दर्शक शशांक सोळंकी, स्टार प्रवाह वाहिनी आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

वेळा बदलत गेल्या आणि आता शेवट

या मालिकेचा टाइम स्लॉट पण खूप वेळा बदलला. मालिका 15 डिसेंबर 2025 ला रात्री 9.30 वाजता सुरु झाली होती. नंतर 16 फेब्रुवारीपासून ती रात्री 10 वाजता दाखवली जाऊ लागली. मग 27 एप्रिलपासून तिला संध्याकाळी 6.30 वाजता टाकलं आणि 10 ऑगस्टपासून ती दुपारी 1 वाजता येत होती.आता 11 ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवला जाणार आहे. एक चांगली मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जात आहे, असं मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे.या मालिकेने प्रेक्षकांना वकिलांच्या घरातली कथा, त्यातले डावपेच आणि प्रेमकथा दाखवली. आता ती संपत असल्यामुळे चाहत्यांना नक्कीच वाईट वाटत आहे.

Web Title: Vachan dile tu mala serial ending milind gawali 280 episodes rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
1

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.