Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veen Doghatli Hi Tutena : स्वानंदी-समरचा वृक्षारोपण उपक्रम ठरतोय खास; नात्यात वाढणार नवी जवळीक

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत येत्या आठवड्यात मनोरंजक घडामोडींचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. यात स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करताना दिसणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 22, 2026 | 02:36 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना रोमँटिक क्षणांसह मनोरंजक घडामोडींचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज आणि नात्यांतील गुंतागुंत यांमधून कथा पुढे सरकत असताना एक खास ट्रॅक प्रेक्षकांसमोर येणार आहे.या ट्रॅकमध्ये स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करताना दिसणार आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक अडचणी आणि विरोध समोर येतो. काही व्यक्ती या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र समर ठामपणे परिस्थिती हाताळत सर्व अडथळ्यांवर मात करतो.या प्रसंगांदरम्यान स्वानंदी आणि समरमधील नात्यांतील भावनिक आणि रोमँटिक क्षणही उलगडत जातात. त्यामुळे आगामी भागात प्रेक्षकांना भावना, संघर्ष आणि नात्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.

या उपक्रमादरम्यान स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे. वृक्षारोपणाच्या या सुंदर वातावरणात, दोघांमध्ये जवळीक वाढणार असून एका रोमँटिक गाण्यावर त्यांच्यातील सुंदर क्षण पाहायला मिळणार आहे. या सगळ्याबद्दल बोलताना स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान म्हणाली, “या गाण्याच्या शूटसाठी मी आमच्या प्रोडक्शनला पूर्ण क्रेडिट देईन. कारण मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. एवढ्या उष्णतेत काम करणं कठीण वाटतं, त्यामुळे गरज नसेल तर टाळावं असंच माझं मत असतं आणि हे फक्त आमच्या शोसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. पण काही सीन खऱ्या वातावरणातच चांगले दिसतात. मला आमच्या प्रोडक्शनचं कौतुक वाटतं की त्यांनी भरपूर सावली आणि झाडं असलेलं लोकेशन निवडलं आणि आमची खूप काळजी घेतली.

Mirzapur मध्ये झळकणार Girls Power! ‘बीना त्रिपाठी आणि गोलूच्या भूमिकांमुळे ‘मिर्झापूर’ पुन्हा चर्चेत

ती पुढे म्हणाली,”आम्ही ठाण्यात शूट करत होतो, पण वातावरण इतकं छान होतं की गावात शूट करत असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःही उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेत होते जसं की तुळशीच्या बियाचं पाणी, सब्जाचं पाणी आणि शॉटनंतर पांढरा स्टोल वापरणं. टीममधले सगळेच सुबोध दादा, हरीश आणि इतर कलाकार एकमेकांना सहकार्य करत होते. त्या दिवशी आम्ही गाण्याबरोबरच वृक्षारोपणाचा सीन ही शूट केला, ह्या गाण्याचं शूट करण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ होता. आम्ही अवघ्या ४५ मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण केलं.मला आशा आहे की हा सीन प्रेक्षकांना नक्की आवडेल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, की आपण कलाकार म्हणून कधी कधी अशा परिस्थितीत शूट करतो पण काही गोष्टी तश्याच छान दिसतात आणि जर सोबत चांगली टीम असेल तर गोष्टीं थोड्या सोप्या वाटतात .”

Sun Marathi Serial: मासिक पाळीवर ‘तू अनोळखी तरी सोबती’ची संवेदनशील मांडणी; समीरचा अर्पिताला आधार, प्रेक्षकांकडून कौतुक

Web Title: Veen doghatli hi tutena swanandi samar tree plantation initiative turns special new bond to deepen between them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.