Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathiचा ऐतिहासिक प्रयोग! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये पहिल्यांदाच ‘नो-डायलॉग’ एपिसोड; सुबोध भावेंनी सांगितला अनुभव

Veen Doghatli Hi Tutena No-Dialogue Episode: झी मराठीच्या 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये प्रथमच संपूर्ण 'नो-डायलॉग' (मौन) एपिसोड सादर करण्यात येणार आहे. सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्या अभिनयाचा अनोखा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन विश्वात नवनवीन प्रयोगांसाठी ओळखली जाणारी झी मराठी पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची आवड जपणाऱ्या या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये प्रथमच संपूर्ण ‘नो-डायलॉग’ (मौन) एपिसोड सादर करण्यात येणार आहे.

एकही संवाद नसलेला हा विशेष भाग केवळ अभिनय, हावभाव, देहबोली, पार्श्वसंगीत आणि भावनांच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. संवादांशिवाय संपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

या विशेष भागात आधिरा घरातून रुसून समरच्या घरी येते. तिचा आणि रोहनचा अबोला वाढत जातो. समर आणि स्वानंदी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, स्वानंदीही काही काळ कोणाशीही न बोलण्याचा निर्णय घेते. रोहन आधिराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतानाच घरात एका चोराची एंट्री होते आणि कथेला वेगळे वळण मिळते.

या अनोख्या प्रयोगाबद्दल अभिनेता सुबोध भावे (समर) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (स्वानंदी) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, हा भाग केवळ वेगळं काही करण्यासाठी केलेला प्रयोग नसून, कथेच्या गरजेतून साकारला गेला आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलन संपलं, पण ८ वर्षांपूर्वीचं ‘हे’ गाणं पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड, लाखो Gen-Z बनवतायत रील्स

सुबोध भावे म्हणाले, “हा पूर्णपणे मौन भाग आहे. या भागात कोणीही कोणाशी बोलत नाही. एकही संवाद न वापरता संपूर्ण भाग सादर करणं हे मोठं धाडस आहे. संवादांशिवाय केवळ देहबोली, नजरा आणि हावभावातून भावना व्यक्त करणं हे खूप आव्हानात्मक आहे.”

ते पुढे म्हणाले, “कधी कधी शांत राहणंही गरजेचं असतं. सतत बोलत राहिलं की शब्दांची किंमत कमी होते. काही काळ शांतता अनुभवली की पुन्हा एकमेकांशी बोलावंसं वाटतं आणि ते बोलणं अधिक मनापासून होतं.”

या ‘नो-डायलॉग’ एपिसोडमधून कलाकारांच्या अभिनयाची खरी कसोटी लागणार असून, मराठी मालिकांच्या इतिहासातील हा प्रयोग प्रेक्षकांसाठीही वेगळा अनुभव ठरणार आहे.

Main Vaapas Aaunga OTT Release: शर्वरी वाघची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आता ओटीटीवर, जाणून घ्या कधी व कुठे पाहायचा?

Web Title: Veen doghatli hi tutena to feature its first ever no dialogue episode subodh bhave shares his experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • subodh bhave
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज
1

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज

Aai Tuljabhavani Serial: चातुर्मासाची पोथी अचानक गायब, अन् महालात झाली बालगणेशांची एन्ट्री; पुढे काय घडणार?
2

Aai Tuljabhavani Serial: चातुर्मासाची पोथी अचानक गायब, अन् महालात झाली बालगणेशांची एन्ट्री; पुढे काय घडणार?

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव
3

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
4

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.