Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत

Zee Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या नव्या प्रोमोमध्ये समर स्वानंदीसाठी खास सरप्राईज प्लॅन करतो. स्वानंदीचा मॉडर्न लूक आणि दोघांचा रोमँटिक अंदाज चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 10:21 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi Serial: Zee Marathiवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदीच्या नात्यातील गोड क्षण चाहत्यांना विशेष आवडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यांच्या नात्यात अनेक अडथळे आले असले तरी मिस्टर अँड मिसेस राजवाडेंचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होताना दिसत आहे.

आता मालिकेच्या आगामी भागात समर स्वानंदीसाठी एक खास सरप्राईज प्लॅन करताना दिसणार आहे. झी मराठीने नुकताच या खास सरप्राईजचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘वेलकम टू समर कॅफे’; बायकोसाठी समरची खास तयारी

प्रोमोमध्ये समर स्वानंदीसाठी घरच्या घरी खास प्लॅनिंग करताना दिसत आहे. त्याने यासाठी सुंदर सजावट केली आहे. दिवे, शोभेची फुलं, टेंट आणि चारही बाजूंना आकर्षक लाइटिंग असा सगळा सेटअप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ‘वेलकम टू समर कॅफे’ अशी खास पाटीही लावण्यात आली आहे.

समरने केलेली ही सुंदर तयारी पाहून स्वानंदी भारावून जाते. यावेळी ती पहिल्यांदाच एका वेगळ्या आणि मॉडर्न लूकमध्ये समरसमोर एन्ट्री घेते. गुलाबी रंगाचा लाँग वनपीस परिधान केलेली स्वानंदी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

स्वानंदी झाली भावुक; समरसमोर व्यक्त केल्या मनातील भावना

समरने तिच्यासाठी केलेलं हे खास सरप्राईज पाहून स्वानंदी भावुक होते. समरच्या प्लॅनिंगचं कौतुक करत ती म्हणते, “My God… तुम्ही किती छान प्लॅनिंग केलं आहे, हे किती गोड सरप्राइज आहे.”

यानंतर स्वानंदी आपल्या मनातील भावना समरसमोर व्यक्त करते. “अशी स्वप्न पाहण्याचीसुद्धा मी हिंमत केली नव्हती. पण, बघा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सगळं काही बदलून गेलं. माझं आयुष्य, माझं नशीब सगळं काही तुम्ही बदलून टाकलंत,” असं ती म्हणते. हे बोलताना तिचे डोळे पाणावतात.

यानंतर समरकडे पाहत ती आपल्या प्रेमाची कबुली देते. “माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे,” असं स्वानंदी म्हणते. तिच्या या भावुक क्षणामुळे प्रोमो आणखी खास झाला आहे.

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

समर आणि स्वानंदीच्या या सुंदर क्षणांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला.

“समर-स्वानंदी लव्ह यू”, “किती गोड प्रोमो आहे हा”, “आम्हाला पण समर कॅफेमध्ये यायचं आहे”, “किती सुंदर सरप्राईज प्लॅन केलंय”, “वॉव समर-स्वानंदी”, “यांची केमिस्ट्री खरंच भारीये” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

समरने स्वानंदीसाठी केलेलं हे खास सरप्राईज आणि त्यानंतर स्वानंदीने व्यक्त केलेल्या प्रेमाच्या भावना पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज

Web Title: Zee marathi serial samar swanandi special surprise veen doghatli hi tutena promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
1

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.