Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Mirzapur The Movie Release : ओटीटीवर तुफान यश मिळवल्यानंतर 'मिर्झापूर' ही अतिशय लोकप्रिय फ्रँचायझी आता 'मिर्झापूर: द मूव्ही' द्वारे मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने PVR INOX, एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओज यांनी एका खास भागीदारीची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 03:48 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एक्सेल एंटरटेनमेंटच्या ‘मिर्झापूर’चा दबदबा
  • PVR INOX बनलं ‘मिर्झाPVR’
  • नावात बदल करत ‘मिर्झाPVR’ची मोठी घोषणा
Mirzapur The Movie Release : PVR INOX, एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओज यांनी आज ‘मिर्झापूर: द मूव्ही’साठी या खास भागीदारीची घोषणा केली. यासोबतच प्रचंड लोकप्रिय असलेली ही फ्रँचायझी आता सिनेमागृहांमध्ये ( Mirzapur The Movie Release ) दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. या खास प्रसंगाचा जल्लोष करण्यासाठी PVR INOXचं नाव बदलून ‘मिर्झाPVR’ करण्यात येणार आहे. देशातील निवडक सिनेमागृहांमध्ये हा खास टेकओव्हर पाहायला मिळणार असून, त्याची टॅगलाइन आहे “मिर्झाPVR  भौकाल आता मोठ्या पडद्यावर.”

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन

चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय

PVR INOX साठी ही भागीदारी दर्शवते की चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या फ्रँचायझीला मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या सिनेमॅटिक अनुभवासह सादर करून प्रेक्षकांशी अधिक घट्ट नातं निर्माण करण्याच्या किती मोठ्या संधी आहेत. तर एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओजसाठी ही भागीदारी ‘मिर्झापूर’ची सातत्याने टिकून असलेली लोकप्रियता, त्यातील व्यक्तिरेखा, कथा आणि गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेली खास ओळख यासोबत प्रेक्षकांचं असलेलं घट्ट नातं अधोरेखित करते.

‘मिर्झापूर’ एक कल्चरल फेनोमेनन

एक्सेल एंटरटेनमेंटचे CEO विशाल रामचंदानी म्हणाले, “गेल्या काही वर्षांत ‘मिर्झापूर’ एक कल्चरल फेनोमेनन बनलं आहे आणि त्याचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. जेव्हा आम्ही ही फ्रँचायझी सिनेमागृहांमध्ये घेऊन येत आहोत, तेव्हा तिची घोषणा देखील तिच्या भव्यतेला आणि ओळखीला साजेशी असावी, अशी आमची इच्छा होती. ‘मिर्झाPVR’ हा याच खास क्षणाचा उत्सव आहे आणि ‘मिर्झापूर’ला आजच्या या उंचीवर पोहोचवणाऱ्या प्रेक्षकांना दिलेली ही एक खास आदरांजली आहे.”

PVR INOXमध्ये आमचा विश्वास

PVR INOX लिमिटेडच्या लीड-स्ट्रॅटेजिस्ट निहारिका बिजली म्हणाल्या, “PVR INOXमध्ये आमचा विश्वास आहे की सिनेमाची ताकद केवळ चित्रपट पाहण्यात नाही, तर असा अनुभव एकत्र जगण्यात आहे, जो पुढे जाऊन एक कल्चरल मोमेंट बनू शकतो. ‘मिर्झापूर’साठी एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओजसोबतची आमची भागीदारी देखील असाच एक खास क्षण आहे.

आयकॉनिक विश्व आणखी मोठं करण्याची संधी

‘मिर्झापूर’ ही एक अशी मोठी फ्रँचायझी आहे, जिने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांसोबत मजबूत नातं निर्माण केलं आहे. त्यामुळे तिचं मोठ्या पडद्यावर आगमन हे तिची दमदार कथा, लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा आणि प्रचंड उत्साही फॅन बेस यांचा स्वाभाविक विस्तार वाटतो. चाहत्यांनी यापूर्वी कधीही इतक्या भव्य आणि शानदार सिनेमॅटिक अंदाजात न पाहिलेलं हे आयकॉनिक विश्व आणखी मोठं करण्याची ही एक खास संधी आहे.”

भागीदारी संपूर्ण भारतातील निवडक PVR INOX सिनेमागृहांत

‘मिर्झाPVR’ची ही भागीदारी संपूर्ण भारतातील निवडक PVR INOX सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये दिल्लीतील आयकॉनिक प्रिया सिनेमा देखील सहभागी आहे. याशिवाय मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ आणि इतर शहरांमधील सिनेमागृहांमध्येही हा खास टेकओव्हर पाहायला मिळेल.

या तारखेला सिनेमागृहात

अमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चं दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलं असून, चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य

Web Title: Mirzapur the movie release pvr inox partner mirzapvr takeover release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • amazon prime video
  • Amezon Prime
  • Bollywood
  • Hindi Movie
  • INOX
  • Marathi News
  • Mirzapur
  • Pankaj Tripathi
  • PVR
  • Web Series

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
1

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
2

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन
3

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन

High Court Action On Dabur Toothpaste : दाबर कंपनीला मोठा धक्का! ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी; नेमका का घेतला निर्णय?
4

High Court Action On Dabur Toothpaste : दाबर कंपनीला मोठा धक्का! ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी; नेमका का घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.