Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Mirzapur The Movie Review: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ॲक्शन, दमदार संवाद आणि पार्श्वसंगीताचं कौतुक केलं. मुन्ना भैयाच्या भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 04, 2026 | 12:41 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur The Movie Review: अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ आज, ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवरील लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या ‘मिर्झापूर’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता याच मालिकेचा विस्तार मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असून, पहिल्या शोपासूनच चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

‘मिर्झापूर’चा जुना अंदाज पुन्हा मोठ्या पडद्यावर

‘मिर्झापूर’ म्हटलं की गुन्हेगारी, सत्तासंघर्ष, सूड, दमदार संवाद आणि थरारक ॲक्शन हे सगळं आलंच. ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्येही या सगळ्या घटकांची झलक पाहायला मिळत असल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. अनेकांनी चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स, संवाद आणि पार्श्वसंगीताचं विशेष कौतुक केलं आहे.

वेब सीरिजमध्ये पाहिलेलं ‘मिर्झापूर’चं जग आता मोठ्या पडद्यावर अनुभवणं हा चाहत्यांसाठी वेगळाच अनुभव असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

मुन्ना भैयाने पुन्हा लुटली महफिल

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती मुन्ना भैयाची, म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा याची. ‘मिर्झापूर’च्या कथेत मुन्ना भैयाचं पात्र संपवण्यात आलं होतं. मात्र, चित्रपटातील त्याच्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी दिव्येंदू शर्माच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. मुन्ना भैयाला पुन्हा पाहायला मिळणं हीच चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरल्याचं दिसत आहे. काही प्रेक्षकांनी तर ‘मुन्ना भैया म्हणजे बल, बुद्धी आणि दबदब्याचं कम्प्लीट पॅकेज’ अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं आहे.

कालीन भैया आणि गुड्डू पंडितचा संघर्ष कायम

पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कालीन भैया या दमदार भूमिकेत परतले आहेत. त्याचबरोबर अली फजल गुड्डू पंडितच्या भूमिकेत दिसत आहे. या दोघांमधील संघर्ष हा चित्रपटाच्या कथेतील महत्त्वाचा भाग असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दिव्येंदू शर्माच्या मुन्ना भैयाच्या उपस्थितीमुळे ‘मिर्झापूर’च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा

प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्ये ॲक्शन आणि संवादांचं कौतुक

पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील ॲक्शन, धारदार संवाद आणि पार्श्वसंगीताचं कौतुक केलं आहे. ‘मिर्झापूर’चा तोच रॉ अंदाज मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह दिसत आहे.

एकूणच, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ प्रदर्शित होताच मुन्ना भैया, कालीन भैया आणि गुड्डू पंडित या लोकप्रिय पात्रांची पुन्हा चर्चा रंगली आहे. आता येत्या दिवसांत चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Web Title: Mirzapur the movie review munna bhaiya divyendu sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम
1

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा
2

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन
3

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Alpha Movie: ‘ऐल्फा’ची Netflix Global Top 10 मध्ये दमदार एन्ट्री; आलिया भट्ट-शर्वरीचा स्पाय थ्रिलर #1 वर
4

Alpha Movie: ‘ऐल्फा’ची Netflix Global Top 10 मध्ये दमदार एन्ट्री; आलिया भट्ट-शर्वरीचा स्पाय थ्रिलर #1 वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.