Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samarth Movie : सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा पडला पार! समर्थ रामदासांचे विचार आणि सुमधुर संगीत

आध्यात्म, संस्कार आणि प्रेरणेचा संदेश देणारा 'समर्थ' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. संगीत अनावरण सोहळ्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 03:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

समर्थ रामदास स्वामींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेल्या आगामी ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाच्या संगीताचे भव्य अनावरण नुकतेच पुण्यातील चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहात पार पडले. भक्तिमय वातावरण, सुरेल गीतांची मैफल, कलाकारांचे मनोगत आणि चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रवास उलगडणाऱ्या संवादांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: “स्त्रीनं ठरवलं तर जग जिंकू शकते!” अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची भावुक पोस्ट

कार्यक्रमाची सुरुवात गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील चित्रपटातील भव्य प्रार्थनेच्या विशेष दृश्याने झाली. त्यानंतर चित्रपटाच्या संगीताचे अधिकृत अनावरण करण्यात आले. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी चित्रपटातील गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यशैलीत सादर केलेल्या विशेष नृत्याविष्काराने कार्यक्रमाला वेगळी रंगत आणली. समारोपाच्या वेळी शंकर महादेवन यांच्या प्रार्थनेवर शर्वरी जमेनीस यांच्या नृत्यसंस्थेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भव्य नृत्याविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या संगीत अनावरण सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे चित्रपटातील प्रत्येक गीतामागील संकल्पना, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, निर्मात्यांची भूमिका, गीतलेखन, संगीतनिर्मिती आणि गायनाचा प्रवास यावर कलाकार, गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा. या संवादातून प्रेक्षकांना चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची आणि संगीतनिर्मितीची प्रेरणादायी झलक अनुभवायला मिळाली.

चित्रपटाचे संगीत ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित आणि युवा संगीतकार-गायक रोहित राऊत यांनी दिले आहे. चित्रपटातील सात गीतांपैकी पाच गीतांना केदार पंडित यांनी, तर दोन गीतांना रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे. गीतकार नचिकेत जोग यांनी चार गीते लिहिली असून मंदार चोळकर आणि रोहित राऊत यांनी प्रत्येकी एक गीत लिहिले आहे. याशिवाय समर्थ रामदास स्वामी आणि वेण्णास्वामी यांच्या पारंपरिक रचनांचाही प्रभावी वापर चित्रपटात करण्यात आला आहे. यावेळी दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी सांगितले की, ‘समर्थ’ हा समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आजच्या काळाशी जोडणारा भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळेल. कथानकाप्रमाणेच संगीतही चित्रपटाचा आत्मा असून प्रत्येक गीत कथेला पुढे नेणारे आणि पात्रांच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करणारे आहे. संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांनी या प्रवासाची पहिली अनुभूती घेतली असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या गीतांचा प्रभाव अधिक जाणवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?

चित्रपटाचे निर्माते रविंद्र पाठक यांनीही ‘समर्थ’ हा प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा चित्रपट असल्याचे सांगितले. संस्कार, अध्यात्म, प्रेरणा आणि नात्यांची जपणूक करणारा हा संगीतमय प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरेल, असे ते म्हणाले.

थर्मोलाईन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाचे निर्माते, रामकथाकार, प्रवचनकार आणि उद्योजक रविंद्र पाठक असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. चित्रपटात पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस, भूषण प्रधान, ईशा केशकर, दिशा परदेशी, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, निखिल राऊत, अयान दरेकर, श्रीजय देशपांडे आणि अभिज्ञा माथवड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आध्यात्म, संस्कार, प्रेरणा आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम असलेला ‘समर्थ’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी भारतासह परदेशात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील सर्व गीते ‘मानस किनकर रविंद्र पाठक’ या अधिकृत यूट्यूब चॅनेलसह सर्व प्रमुख डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Music launch ceremony of the film samarth organized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Indian Classical Music
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Vijaya Mehta : ‘माझी आई, माझी सर्वकाही…’ विजया मेहता यांच्या मृत्यूच्या बातमीने नीना कुलकर्णी झाल्या हळव्या
1

Vijaya Mehta : ‘माझी आई, माझी सर्वकाही…’ विजया मेहता यांच्या मृत्यूच्या बातमीने नीना कुलकर्णी झाल्या हळव्या

Deool Band 2 : सिनेमाच्या कथेतही पत्नीचं योगदान! आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो, स्नेहल तरडेने कथाच बदलली
2

Deool Band 2 : सिनेमाच्या कथेतही पत्नीचं योगदान! आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो, स्नेहल तरडेने कथाच बदलली

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
3

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप
4

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.