
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या असं अचानक जाण्याने सर्वांनाच मोठ धक्का बसला आहे.
नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अभिनयातील वेगळेपणा, दमदार संवादफेक आणि प्रभावी व्यक्तिरेखांमुळे त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
नाना पाटेकर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसोबतच त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त प्रकरणांचीही चर्चा वेळोवेळी झाली. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेले प्रकरण म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी केलेले लैंगिक छळाचे आरोप.(Nana Patekar)
२००८ मध्ये तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ‘ओके’ प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मार्च २००८ मध्ये तिने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन अर्थात CINTAA कडे तक्रार केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी या तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे नंतर समोर आले.
तनुश्रीने २०१३ मधील एका मुलाखतीतही हे आरोप पुन्हा केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये तिने पुन्हा एकदा या घटनेबाबत सार्वजनिकरित्या भाष्य केले. या आरोपांनंतर भारतातील, विशेषतः बॉलिवूडमधील ‘मी टू’ चळवळीला मोठी चालना मिळाली.
२०१८ च्या अखेरीस CINTAA ने तनुश्रीची माफी मागत, २००८ मधील तिच्या लैंगिक छळाच्या मुख्य तक्रारीकडे योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नव्हते, असे मान्य केले. मात्र, प्रकरणाला अनेक वर्षे झाल्यामुळे ते पुन्हा उघडता येणार नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
यानंतर तनुश्रीने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. नाना पाटेकर यांच्यासह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माते समी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि काही मनसे कार्यकर्त्यांविरोधात तिने आरोप केले होते.
१ ऑक्टोबर २०१८ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर आणि इतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत विनयभंग आणि अश्लीलतेशी संबंधित आरोप नोंदवण्यात आले होते.
जून २०१९ मध्ये ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणात B-Summary अहवाल दाखल केला. या अहवालात तनुश्री दत्ताची तक्रार दुर्भावनापूर्ण किंवा सूडबुद्धीने प्रेरित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांच्याविरोधातील या प्रकरणाला पोलिस तपासाच्या पातळीवर दिलासा मिळाला.
दरम्यान, तनुश्री दत्ताने हे प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता व्यक्त केली होती. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रदीर्घ कलात्मक कारकिर्दीची आणि त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची पुन्हा चर्चा होत आहे.