Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत?
कोण आहे नाना पाटेकर यांची पत्नी?
अनेकांना ठाऊक नाही पण नाना पाटेकर यांची पत्नी मराठी अभिनेत्री आहे. त्यांचे नाव आहे ‘नीलकांति पाटेकर’. १९६६ साली त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली. चित्रपटातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील देण्यात आला. सुरुवातीला त्यांनी एका बॅंकेत काम केले आणि नंतर मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला पाय रोवला. फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर लेखिका म्हणूनही त्यांनी काम केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या, तथापि ‘छावा’ या चित्रपटात त्यांचा दमदार कमबॅक पाहायला मिळाला.
मैत्री आणि मग प्रेम…
नाना पाटेकर आणि नीलकांती यांची ओळख एका थिएटरमध्ये झाली. इथून त्यांच्यात मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १९७८ मध्ये दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही दोन मुलं झाली ज्यातील एकाचे नाव दुर्वासा पाटेकर आणि तर दुसऱ्याचे नाव मल्हार पाटेकर ठेवण्यात आलं. तथापि, दुर्वासा एका आजाराने ग्रस्त असल्याने दिड अडीच वर्षातच त्याचा मृत्यू झाला. मल्हार पाटेकर या त्यांच्या मुलाने ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाची कामगिरी निभावली आहे. एका प्रोडक्शन हाउसचे ते मालक असून ‘नानासाहेब प्रोडक्शन हाऊस’ असे याचे नाव आहे.
Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
३५ वर्षांपासून वेगळे का?
अलिकडच नाना पाटेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. त्यांची ही मुलाखत प्रचंड गाजली आणि याचे अनेक क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाले. संभाषणादरम्यान नाना पाटेकर यांनी पत्नीपासून वेगळे राहण्याचे कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पत्नी नीलकांती आणि त्यांच्या स्वभावात आणि विचारात बरीच तफावत आहे. यामुळेच ते दोघेही स्व-मर्जीने वेगळे राहतात. तथापि, अभिनयाच्या त्यांच्या या प्रवासात पत्नीने फार मोठे योगदान दिला असून त्यासाठी ते तिचा आदर करतात असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.






