Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Nana Patekar Death : नाना पाटेकर यांच्या अभिनयाची माहिती सर्वांनाच आहे, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी आजही फारशा चर्चेत येत नाहीत. विशेषतः त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2026 | 09:00 AM
Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकर यांच्या पत्नीनेही चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • दोघांची पहिली भेट नेमकी कुठे आणि कशी झाली, याचीही एक रंजक कहाणी आहे.
  • त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील एका निर्णयामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत नानांनी स्वतः एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. गोव्यातील राहत्या घरात त्यांना हृयविकाराचा झटका आला ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतरही जेव्हा ते शुद्धीवर आले नाहीत तेव्हा डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अभिनेत्याच्या अशा अकस्मित मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला असून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विश्वजीत दिनकरराव पाटेकर हे त्यांचं मूळ नाव पण सर्वत्र त्यांना नाना याच नावाने ओळखले जात होतं. नानांना आपण त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखतो; मात्र त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज या लेखात आपण नाना पाटेकर यांच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत. पत्नीला घटस्फोट न देताही तब्बल ३५ वर्षांपासून ते का वेगळे राहत आहेत याची माहिती स्वत: नानांनी एका मुलाखतीत दिली.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

कोण आहे नाना पाटेकर यांची पत्नी?

अनेकांना ठाऊक नाही पण नाना पाटेकर यांची पत्नी मराठी अभिनेत्री आहे. त्यांचे नाव आहे ‘नीलकांति पाटेकर’. १९६६ साली त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली. चित्रपटातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील देण्यात आला. सुरुवातीला त्यांनी एका बॅंकेत काम केले आणि नंतर मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला पाय रोवला. फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर लेखिका म्हणूनही त्यांनी काम केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या, तथापि ‘छावा’ या चित्रपटात त्यांचा दमदार कमबॅक पाहायला मिळाला.

मैत्री आणि मग प्रेम…

नाना पाटेकर आणि नीलकांती यांची ओळख एका थिएटरमध्ये झाली. इथून त्यांच्यात मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १९७८ मध्ये दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही दोन मुलं झाली ज्यातील एकाचे नाव दुर्वासा पाटेकर आणि तर दुसऱ्याचे नाव मल्हार पाटेकर ठेवण्यात आलं. तथापि, दुर्वासा एका आजाराने ग्रस्त असल्याने दिड अडीच वर्षातच त्याचा मृत्यू झाला. मल्हार पाटेकर या त्यांच्या मुलाने ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाची कामगिरी निभावली आहे. एका प्रोडक्शन हाउसचे ते मालक असून ‘नानासाहेब प्रोडक्शन हाऊस’ असे याचे नाव आहे.

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

३५ वर्षांपासून वेगळे का?

अलिकडच नाना पाटेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. त्यांची ही मुलाखत प्रचंड गाजली आणि याचे अनेक क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाले. संभाषणादरम्यान नाना पाटेकर यांनी पत्नीपासून वेगळे राहण्याचे कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पत्नी नीलकांती आणि त्यांच्या स्वभावात आणि विचारात बरीच तफावत आहे. यामुळेच ते दोघेही स्व-मर्जीने वेगळे राहतात. तथापि, अभिनयाच्या त्यांच्या या प्रवासात पत्नीने फार मोठे योगदान दिला असून त्यासाठी ते तिचा आदर करतात असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.

 

Web Title: Nana patekar wife neelakanti patekar marriage personal life 35 years separation reason nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Actor
  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा
1

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
2

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ
3

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा कारगिलशी खास संबंध; दोन महिने सीमेवर राहून लढले, जाणून घ्या सैन्याशी नातं
4

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा कारगिलशी खास संबंध; दोन महिने सीमेवर राहून लढले, जाणून घ्या सैन्याशी नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.