मराठी सिनेविश्वाप्रमाणे आता मराठी ओटीट विश्वातही नवेनवे प्रयोग होत आहेत. विविध विषयावरील चित्रपट, वेबसिरज सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांमधील कंटेटही वेबसिरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. आता प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीवर आधारित एक सीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजचं नाव ‘लंपन’ (Lampan)असं आहे. नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास’वर आधारित या निरागस व आत्म-शोधाच्या हृदयस्पर्शी कथेमध्ये मिहिर गोडबोले यांनी प्रतिष्ठित भूमिका लंपन साकारली आहे. ही सिरीज १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
[read_also content=”करीना कपूर सैफ अलीनं पापाराझींसमोरच एकमेकांना केलं किस, नेटिझन्सने सुरू केलं ट्रोलींंग https://www.navarashtra.com/movies/saif-ali-khan-kareena-kappr-kissed-each-other-in-front-of-paparazzi-netizens-trolled-them-nrps-532853.html”]
मराठी साहित्याची जादू असलेली ही सिरीज तरूण मुलगा लंपनच्या आत्म-शोधाच्या प्रयत्नांच्या कथेला सादर करते. मिहिर प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार देखील आहेत जसे लंपनच्या ‘आजी’च्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, त्याच्या आजोबाच्या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, त्याची जिवलग मैत्रिण सुमीच्या भूमिकेत अवनी भावे आणि त्याच्या वडिलांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर व त्याच्या आईच्या भूमिकेत कादंबरी कदम आहे.
आपल्या भूमिकेबाबत सांगताना गीतांजली म्हणाल्या, “मी प्रकाश नारायण संत जी यांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या कथा ऐकत मोठे झाले आणि त्यांच्या कथांमधील जादुई विश्वाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतले. आता, त्यांच्या लोकप्रिय कलाकृतीमधील एका पात्राची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. लंपनच्या आजीची भूमिका साकारण्याचा अनुभव अद्वितीय आहे. तिला प्रेमाने आजी म्हणून हाक मारतात. ती लंपनवर प्रेमाचा वर्षाव करते, तसेच त्याला मार्गदर्शन देखील करते, आपुलकी दाखवण्यासह शिस्तबद्धतेचे धडे देते. जुन्या आठवणींकडे घेऊन जात ही सिरीज तुम्हाला सहजगत्या काळाचा अनुभव देते, जेथे कौटुंबिक नाते आणि बालपणातील निरागसतेला अधिक महत्त्व दिले जाते.”
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिरीजचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत. तरूण मुलगा लंपन बालपणीच्या गुंतागुंतीमधून जाण्याच्या रोमांचक प्रवासाचा अनुभव घ्या, जेथे तो ओळख व आपलेपणाच्या शोधावर जातो. लंपन ही वेबसिरिज १६ मेपासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.