(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन सिंह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता त्याच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. गृह मंत्रालयाने पवन सिंहला वाय-प्लस सुरक्षा सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून देण्यात आलेल्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टचा आधार घेण्यात आला आहे. या अहवालात पवन सिंहच्या संबंधित सुरक्षेच्या दृष्टीने काही गंभीर बाबी अधोरेखित करण्यात आल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही काळात पवन सिंहच्या भोवती वाढत असलेल्या वादविवादांमुळे आणि संभाव्य सुरक्षेच्या धोक्यांमुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. IB च्या तपशीलवार अहवालानंतर गृह मंत्रालयाने त्याला वाय-प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. वाय-प्लस सुरक्षा अंतर्गत पवन सिंहच्या सोबत ८ सशस्त्र कमांडो आणि पोलीस कर्मचारी कायम तैनात असणार आहेत.यासंदर्भात अभिनेता पवन सिंहने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी चाहत्यांमध्ये या निर्णयामुळे उत्सुकता आणि चिंता दोन्ही दिसून येत आहेत.
फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या वाढल्या अडचणी, परदेशात जाण्यास न्यायालयाने दिला नकार
यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, पवन सिंहने अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ते दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तसेच उपेंद्र कुशवाहा यांच्याशीही त्याने चर्चा केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवन सिंह आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असू शकतो. त्यामुळेच त्याच्याभोवतीचा राजकीय आणि सामाजिक तणाव लक्षात घेऊन त्याला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात पवन सिंहला बाबा खानच्या गुंडांकडून थेट धमकी देण्यात आली होती. या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे पवन सिंहच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या वाढल्या अडचणी, परदेशात जाण्यास न्यायालयाने दिला नकार
वाय-प्लस सुरक्षा म्हणजे काय?
वाय-प्लससुरक्षा ही सरकारकडून दिली जाणारी एक विशेष सुरक्षा व्यवस्था आहे. ही सुरक्षा फक्त अशा लोकांना दिली जाते ज्यांना कोणीतरी दुखापत करू शकतो किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे असं सरकारी यंत्रणांना वाटतं.या सुरक्षेमध्ये १ ते २ प्रशिक्षित कमांडो सतत त्या व्यक्तीच्या सोबत असतात. हे कमांडो त्या व्यक्तीसोबत फिरतात, त्यांच्या वाहनासोबत असतात, आणि त्या व्यक्ती जिथे जाईल तिथल्या परिसराची तपासणी करतात.ही सुरक्षा राजकारणी, कलाकार, किंवा इतर चर्चेत असलेल्या लोकांना दिली जाते. विशेषतः जर त्यांना धमक्या मिळाल्या असतील, किंवा त्यांच्या भोवती तणावाचं वातावरण असेल तर ही सुरक्षा त्यांना दिली जाते.