Hardik Pandya कडून Lamborghini Car खरेदी
Hardik Pandya Car: भारतात लक्झरी कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आजही एखादी लक्झरी कार जेव्हा रस्त्यावरून जाताना दिसते, तेव्हा आपसूकच अनेकांची नजर त्या कारवर रोखली जाते. देशात उद्योगपती, सुपरस्टार आणि क्रिकेटर्सच्या कार कलेक्शनमध्ये तर हमखास आपल्या अनेक आलिशान कार पाहायला मिळतात. नुकतेच हार्दिक पंड्या त्याच्या नवीन आलिशान कारसोबत स्पॉट झाला आहे.
भारतात Lamborghini च्या कारची एक वेगळीच क्रेझ आहे. अनेक सेलिब्रेटी मंडळींच्या कार कलेक्शनमध्ये या कारचा समावेश असतो. नुकतेच भारताचा स्टार क्रिएकटपटू हार्दिक पंड्याने Lamborghini Urus कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 4.57 कोटी रुपये आहे. ही कार ऑगस्ट 2024 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती आणि ही पहिली प्लग-इन हायब्रिड एसयूव्ही आहे.
हार्दिकची नवीन कार पिवळ्या रंगाची आहे आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. खरंतर, हार्दिक पंड्या त्याच्या लक्झरी कार कलेक्शनसाठी ओळखला जातो. ही कार लॅम्बोर्गिनी उरुस एसई एसयूव्ही आहे. ही कार ऑगस्ट 2024 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, ही भारतातील पहिली प्लग-इन हायब्रिड एसयूव्ही आहे.
या आलिशान कारची शोरूम किंमत 4.57 कोटी रुपये आहे. हार्दिकने ही कार पिवळ्या रंगात खरेदी केली आहे. या कारचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हार्दिक आधीच लक्झरी कारचा चाहता आहे. त्याच्याकडे आधीच अनेक महागड्या आणि आलिशान कार आहेत. त्यात आता ही लॅम्बोर्गिनी कार त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक भर.
रेकॉर्ड ब्रेक विक्री! नवरात्रीत गाड्यांची बंपर खरेदी, ऑटो सेक्टरमध्ये 34% वाढीचा विक्रम
ही कार फक्त दिसण्यातच दिमाखदार नाही तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा दमदार आहे. ही Lamborghini कंपनीची पहिली प्लग-इन हायब्रिड SUV आहे. म्हणजेच ही कार पेट्रोल इंजिनसोबतच इलेक्ट्रिक मोटरवरही चालू शकते. यात 4.0 लिटरचं टर्बोचार्ज्ड V8 इंजिन देण्यात आलं आहे, जे 25.9 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीसोबत काम करतं. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनतून कार तब्बल 800 हॉर्सपावरची पॉवर आणि 950 Nm टॉर्क निर्माण करते. फक्त इंजिनच्या दमावरच ही SUV 620 हॉर्सपावरची ताकद आणि 800 Nm टॉर्क देऊ शकते.