Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Nupur Alankar: अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी २७ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर संन्यास का घेतला? आईच्या आजारपणापासून निधनापर्यंतच्या घटनांनी कसा बदलला त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 09:54 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nupur Alankar : अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक कलाकार प्रचंड मेहनत घेतात. काही जण आपल्या करिअरच्या शिखरावर पोहोचतात, तर काही जण आयुष्यातील वेगळ्या वाटेचा शोध घेत या झगमगत्या दुनियेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतात. अभिनेत्री नुपूर अलंकार यांचाही असाच एक वेगळा प्रवास आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या नुपूर यांनी काही वर्षांपूर्वी ग्लॅमरच्या दुनियेला रामराम करत अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि संन्यास घेतला.

नुपूर यांनी हा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला होता. आता अभिनेत्री ते संन्यासिनी झालेल्या नुपूर यांनी आपल्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे. ‘TeleTalk’शी बोलताना त्यांनी आपल्या २७ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.

‘मी काहीही अचानक केलं नाही’

आपल्या निर्णयाबद्दल बोलताना नुपूर म्हणाल्या, “मी काहीही अचानक केले नाही. माझा एक आध्यात्मिक अभ्यास सुरू होता. पण अभिनय क्षेत्रात तुम्ही याबद्दल कोणाशीही बोलू शकत नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, “प्रत्येकाला एक दिवस देवाला शरण जावेच लागते. मी सन्मानाने त्याला शरण गेले. तुमच्यापासून काहीही लपलेले नाही. गुगलवर माझ्याबद्दल सर्व काही आहे.”

आईच्या आजारपणाने आयुष्य बदललं

नुपूर यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांनी त्यांना आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं. याबद्दल सांगताना त्यांनी पीएमसी बँक प्रकरण आणि आईचं आजारपण या दोन घटनांचा उल्लेख केला.

त्यांच्या आईच्या उपचारांसाठी पैशांची गरज होती. मात्र आर्थिक अडचणींमुळे उपचारांसाठी पैसे मागण्याची वेळ नुपूर यांच्यावर आली. त्या म्हणाल्या की, आईच्या उपचारांसाठी लोकांकडे मदत मागावी लागल्यानंतर त्यांच्या मनातील बराचसा संकोच दूर झाला.

“माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीने माझे डोळे उघडले. पहिले, पीएमसी बँकेचे प्रकरण. त्यानंतर, माझ्या आईचे आजारपण. पैशांअभावी तिला उपचार मिळू शकले नाहीत. मला तिच्या उपचारासाठी पैसे मागावे लागले. जेव्हा मला तिच्या उपचारासाठी पैसे मागावे लागले, तेव्हा माझी अर्धी लाज नाहीशी झाली,” असं नुपूर यांनी सांगितलं.

आईच्या निधनानंतर घेतला संन्यासाचा निर्णय

नुपूर यांनी सांगितलं की, त्यांची आई ही त्यांची शेवटची मोठी जबाबदारी होती. आईच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.

“माझी आई ही माझी शेवटची जबाबदारी होती; तिच्या निधनानंतर माझ्यावर कोणतीही जबाबदारी उरली नव्हती. तिच्या मृत्यूनंतर मला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर, मी माझ्या जवळच्या लोकांकडून संन्यास घेण्यासाठी परवानगी मागितली. मला वाटले की मी देवाचा आश्रय घ्यावा,” असं त्यांनी सांगितलं.

२७ वर्षांच्या करिअरचा हिशोब ठेवला नाही

नुपूर यांनी तब्बल २७ वर्षे अभिनय क्षेत्रात काम केलं, मात्र या काळाचा त्यांनी कधीही हिशोब ठेवला नाही. त्या म्हणाल्या की, या काळात आपल्याकडून असं कोणतंही काम होऊ नये, ज्याचं उत्तर देवाला देता येणार नाही, याची त्यांनी नेहमी काळजी घेतली.

“मी काम केलेल्या २७ वर्षांचा हिशोब कधीच ठेवला नाही. मी फक्त याची खात्री केली की त्या काळात माझ्यासोबत असे काहीही घडू नये, ज्याचे उत्तर मी देवाला देऊ शकणार नाही,” असं नुपूर यांनी म्हटलं.

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

सेलिब्रिटी म्हणून अज्ञातवासात राहणं होतं कठीण

नुपूर यांच्या मते, संन्यास घेणं त्यांच्यासाठी तितकं कठीण नव्हतं. कारण आयुष्यातील सत्याची जाणीव त्यांना झाली होती. मात्र एक सेलिब्रिटी म्हणून लोकांपासून दूर आणि अज्ञातपणे जगणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं.

त्या म्हणाल्या, “मला अंतर्मनातून माहित होते की संन्यास घेणे कठीण नाही. मला जीवनातील सत्याची जाणीव झाली होती. पण, एक सेलिब्रिटी म्हणून अज्ञातवासात राहणे कठीण होते. कारण लोक मला ओळखत होते, आणि तुम्ही तिथे वेष बदलून जगू शकत नाही.”

आता भिक्षा मागून मिळते शांती

एकेकाळी ग्लॅमर आणि ऐषआरामाचं जीवन जगलेल्या नुपूर अलंकार यांचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असून त्या संन्यासिनी म्हणून जीवन जगत आहेत. भिक्षा मागून मिळणाऱ्या अन्नावर त्या आपला उदरनिर्वाह करतात. या साध्या जीवनातूनच आपल्याला शांती मिळत असल्याचं नुपूर सांगतात.

नुपूर यांचा अभिनेत्रीपासून संन्यासिनीपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांनंतर घेतलेल्या वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे. त्यांनी स्वतःच या निर्णयामागची कारणं सांगितल्याने त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याच्या या वेगळ्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेता आलं आहे.

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Web Title: Nupur alankar 27 years career left acting became sanyasi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • entertainment
  • Television Actress

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.