
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
२८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या या कलाकृतींमध्ये कॉमेडी, थ्रिलर, हॉरर, ड्रामा आणि सस्पेन्स अशा विविध जॉनरचा समावेश आहे. त्यामुळे घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी या आठवड्यात बरेच पर्याय उपलब्ध असणार आहेत. तुमच्या बिंज-वॉच लिस्टमध्ये कोणते चित्रपट आणि सीरिज समाविष्ट करता येतील, पाहूया…
पूजा मेरी जान
अभिनेत्री हुमा कुरेशी आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेला पूजा मेरी जान हा मिस्ट्री – थ्रिलर चित्रपट २ ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. मृणाल ठाकूर आणि हुमा कुरेशी यांनी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात विक्रम सिंग चौहान आणि विजय राझ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट प्रेम आणि विश्वासघाताची कथा सांगतो.
ओह माय डॉग
अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा ओह माय डॉग हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याची चित्रपटाची कथा प्राणीप्रेमींभोवती फिरते आणि यात भावनिक नाट्या देखील पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही कुटुंबासोबत एखादा चित्रपट सलग पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या चित्रपटाचा तुमच्या यादीत समावेश करू शकता.
टू-व्हीलर सीझन २
प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय मालिका “टू-व्हीलर”चा दुसरा सीझन प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही हा दुसरा सीझन १ ऑक्टोबरपासून ओटीटीवर पाहू शकता. पहिल्या सीझनप्रमाणेच, दुसरा सीझनही प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या मालिकेत गजराज राव, रेणुका शहाणे, स्पर्श श्रीवास्तव, भुवन अरोरा, शिवानी रघुवंशी आणि यशपाल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला हा चित्रपटही ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही हा चित्रपट २ ऑक्टोबरपासून जिओहॉटस्टारवर पाहू शकता. या चित्रपटात निविन पॉली आणि मामिता बैजू यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता तो २ ऑक्टोबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ही विनोदी आणि रोमँटिक मालिका २ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये पाहू शकता. या मालिकेच्या स्टारकास्टमध्ये ऐश्वर्या लक्ष्मी, अर्जुन दास, अर्जुन चिदंबरम आणि राजा रुद्रकोडी यांचा समावेश आहे. या कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.