Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pach Futacha Bachchan Movie: ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये दडलेलं रहस्य काय? ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात उलगडणार अनोखी कथा

Pach Futacha Bachchan Movie: मराठी रंगभूमीवर गाजलेले एकपात्री प्रायोगिक नाटक 'पाच फुटाचा बच्चन' आता चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर प्रदर्शित...

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 12:28 PM
Pach Futacha Bachchan Movie (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Pach Futacha Bachchan Movie (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गाजलेल्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या एकपात्री नाटकाचे आता चित्रपटात रुपांतर
  • चित्रपटात दमदार स्टारकास्ट झळकणार
  • आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर प्रदर्शित 
Entertainment News: नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे . (Pach Futacha Bachchan Movie)

पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार?

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर टीजर प्रदर्शित

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या टीजर पोस्टरनंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या सिनेमाच्या आकर्षक चित्रशीर्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीजर पोस्टरवरुन हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याच्याशी निगडीत आहे असे दिसत आहे. एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती रिंगण करून कीर्तनात दंग झालेले वारकरी असे हे चित्र आहे. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

Suvrat Joshi: ‘साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या सोनम वांगचुक यांना…’; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘या नाटकावर चित्रपट होऊ शकतो…’

दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पाच फुटाचा बच्चन’या एकपात्री नाटकाचा प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या प्रयोगांनाही तुफान प्रतिसाद मिळत राहिला. मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन, पुरस्कार मिळाले, महोत्सवांमध्ये नाटकाचं सादरीकरण झालं. नाटकावर येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढत होता. या नाटकावर चित्रपट होऊ शकतो याची जाणीव होत होती.

निर्माते राहुल कर्णिक यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नाटकाचे प्रयोग योग्य टप्प्यावर थांबवून आम्ही चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली . अस्सल मातीतली कथा भव्य स्वरुपात पडद्यावर चित्रित करण्यासाठी लागणारा तांत्रिक संघ तयार करून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर इथे गेल्या वर्षभरात चित्रीकरण केलेले आहे. आता ‘पाच फुटाचा बच्चन’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

Web Title: Pach futacha bachchan movie announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Movie News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.