Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..! १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार

‘सालबर्डी’ हा रहस्य आणि थराराने भरलेला मराठी चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने यांच्यासह अनेक कलाकारांची दमदार स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 09:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान कथांसोबतच उच्च निर्मितीमूल्यांचा दर्जाही सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यातच मल्टीस्टारर चित्रपटांचा ट्रेंडही सध्या जोरात असून, प्रेक्षकांना एकाच पडद्यावर अनेक दिग्गज कलाकार पाहण्याची संधी मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रहस्य आणि थराराने भरलेला ‘सालबर्डी’ हा नवा मराठी चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनयात लाजवाब, गायनात धुरंधर! ‘या’ मराठी मालिकेच्या अभिनेत्रीने स्वतःच गायलं मालिकेतलं गाणं

या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी अशी कलाकारांची भक्कम फळी पाहायला मिळणार आहे. दमदार कलाकारांची उपस्थिती हीच या चित्रपटाची मोठी ताकद मानली जात आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’च्या बॅनरखाली अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘गुल्हर’, ‘बाबो’ आणि ‘पाणीपुरी’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक थरारक अनुभव आणला आहे. चित्रपटाची कथा एका छोट्याशा ‘सालबर्डी’ गावाभोवती फिरते. या गावात घडणाऱ्या विचित्र आणि भीतीदायक घटनांमुळे निर्माण झालेली दहशत आणि त्या मागचे गूढ सत्य उलगडण्याचा प्रवास हा चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रम यांच्या छायेत उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘Ramayana’ निर्मात्यांनी ७०० कोटींची OTT ऑफर नाकारली; जाणून घ्या मागील मोठी कारणं!

तांत्रिक बाबतीतही चित्रपट मजबूत आहे. छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांनी केले असून पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे, तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिले आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने गाणी अधिक आकर्षक झाली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे. एकूणच रहस्य, थरार आणि भक्कम कलाकारांचा संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: Packed with mystery thrills and a powerhouse star castsalbardi is on its way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत
1

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.