Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझी हत्या करण्याचा प्रयत्न…”, परवीन बाबी-Amitabh Bachchan वाद पुन्हा चर्चेत; Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. यामुळे बॉलिवूडमधील एका जुन्या वादाला तोंड फुटले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 28, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • बॉलिवूडमधील जुना वाद पुन्हा उफाळला
  • परवीन बाबी-अमिताभ बच्चन वाद पुन्हा चर्चेत
  • Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यातील वेदनादायक शेवटच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्ट म्हणाली, “परवीन यांचे आयुष्य खूप दुःखद होते. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्यासोबत जे काही घडले… त्यांची प्रकृती ठीक नव्हती. म्हणजे, मी डॉक्टर नाही, त्यामुळे त्यांना नक्की काय झाले हे मी सांगू शकत नाही, पण त्यांची प्रकृती ठीक नव्हती.”

विकी लालवाणी यांना दिलेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, “जेव्हा ती परत आली, तेव्हा मला आठवतंय की ती स्टारडस्टच्या ऑफिसमध्ये बसून झेरॉक्स मशीन वापरत होती आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुलाखती देत ​​होती, की त्यांना अजूनही तिला मारायचं आहे. मला हेही आठवतंय की परवीन फक्त अंडीच खायची, कारण तिला वाटायचं की इंडस्ट्रीने बाकी सर्व गोष्टींमध्ये विष कालवलं आहे.”

परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘दीवार’ (१९७५), ‘अमर अकबर अँथनी’ (१९७७), ‘काला पत्थर’ (१९७९), ‘शान’ (१९८०) आणि ‘नमक हलाल’ (१९८२) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, परवीन बाबी यांना झटके येऊ लागले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि ते एक आंतरराष्ट्रीय गुंड असल्याचा आरोप केला. त्यांनी असाही आरोप केला की, बच्चन यांनी त्यांचे अपहरण केले होते आणि त्यांच्या कानात मायक्रोचिप बसवण्याचा प्रयत्न केला होता.

आधी गोशाळेत सेवा आणि आता थेट हिजाब? Ankita Lokhande चा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप

जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा असे उघड झाले की परवीन बॉबी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्या प्रेमसंबंधांच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, दोघांनीही या अफवांचे खंडन केले होते.

Pushkar Jog : अभिनेता स्पष्टच बोलला! Reels Star आणि Actor तुलनेवर पुष्करचे मत; म्हणाला “मी आयुष्यात जास्त उतारच…”

पूजाने मुलाखतीत पुढे सांगितले, “मला आठवतंय, माझे वडील मला तिच्या घरी घेऊन गेले होते. ती खूप सुंदर होती आणि माझ्यावर खूप प्रेम करायची. तिने मला ज्या प्रकारे परफ्यूम भेट दिला होता, ते मी कधीही विसरणार नाही. देणे हा तिचा स्वभावच होता.”

परवीन बाबी यांचे जानेवारी २००५ मध्ये निधन झाले. त्यावेळी त्या ५० वर्षांच्या होत्या. असे म्हटले जाते की, परवीन बाबी यांचा मृतदेह मुंबईच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागारात अनेक दिवस असाच पडून होता. ज्यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध असल्याची अफवा होती, त्यात महेश भट्ट यांनी पुढे येऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Web Title: Parveen babiamitabh bachchan controversy resurfaces after pooja bhatts statement the old bollywood dispute sparks fresh shockwaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Birthday: ५ दशकं, असंख्य हिट चित्रपट अन् आजही तोच दरारा! बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ८४वा वाढदिवस
1

Amitabh Bachchan Birthday: ५ दशकं, असंख्य हिट चित्रपट अन् आजही तोच दरारा! बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ८४वा वाढदिवस

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….
2

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Kedar Shinde on Drishyam 3:  ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक
4

Kedar Shinde on Drishyam 3: ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.