Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात न्यूरोलॉजिकल आरोग्यसेवेला नवी दिशा; अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते विशेष क्लिनिक्सचे उद्घाटन

किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे भाग्यश्री यांच्या हस्ते एपिलेप्सी, पार्किन्सन्स, स्ट्रोक, व्हर्टिगो, मेमरी आणि न्युरोपथी क्लिनिक्सचे उद्घाटन. आता अत्याधुनिक न्यूरोलॉजिकल उपचार एकाच छताखाली उपलब्ध.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 01:24 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सने न्यूरोलॉजिकल आजारांवरील उपचार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने विविध विशेष क्लिनिक्सची सुरुवात केली आहे. या क्लिनिक्सचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते पार पडले.

या नव्या उपक्रमांतर्गत एपिलेप्सी, पार्किन्सन्स व मूव्हमेंट डिसऑर्डर्स, स्ट्रोक, डोकेदुखी (हेडेक), व्हर्टिगो व असंतुलन, न्युरोपथी आणि मेमरी क्लिनिक्स सुरू करण्यात आले आहेत. या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देत रुग्णांना तज्ज्ञ निदान, आधुनिक उपचार आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापनाची सुविधा देण्यात येणार आहे.

किम्स हॉस्पिटल्सने या क्लिनिक्सची रचना वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आणि बहुविद्याशाखीय उपचारपद्धती लक्षात घेऊन केली आहे. अनुभवी न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, पुनर्वसन तज्ज्ञ आणि इतर आरोग्य व्यावसायिकांच्या संयुक्त सहकार्यामुळे रुग्णांना वैयक्तिक उपचार योजना, वेळेत निदान आणि सातत्यपूर्ण फॉलो-अपची सुविधा मिळणार आहे.

यावेळी सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ खरकर यांनी सांगितले की, एपिलेप्सी आणि पार्किन्सन्ससारख्या आजारांवर आज अत्याधुनिक उपचार उपलब्ध असून, डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) आणि एपिलेप्सी सर्जरीसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते. मात्र या उपचारांविषयी जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. निखिल जाधव यांनी डोकेदुखी आणि व्हर्टिगो क्लिनिक्समुळे तरुणांची कार्यक्षमता वाढण्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये घट होण्यास मदत होईल, असे सांगितले.

तर डॉ. दिपेश पिंपळे यांनी स्ट्रोकच्या रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत, किम्स हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी पेरिफेरल न्युरोपथीचे लवकर निदान झाल्यास रुग्णांना मोठा फायदा होऊ शकतो, असेही नमूद केले.

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

किम्स हॉस्पिटल्सचे प्रादेशिक संचालक सौरभ गुप्ता यांनी सांगितले की, बदलत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन सुपर-स्पेशालिटी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर आणि ‘रुग्ण प्रथम’ या तत्त्वावर आधारित सेवा देण्याचा किम्स हॉस्पिटल्सचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या नव्या उपक्रमामुळे ठाणे, मुंबई आणि एमएमआर परिसरातील रुग्णांना न्यूरोलॉजिकल आजारांचे निदान, उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन देखभाल यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा किम्स हॉस्पिटल्सचा प्रयत्न आहे.

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

Web Title: Bollywood actress bhagyashree inaugurates neurology clinics at kims hospitals thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Helath News
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.