Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पुराने दिन’ या गाण्यातून मैत्री, पहिलं प्रेम आणि कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. हे गाणं गायक अरिजित सिंगने गायलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pehla Pyaar Doosri Baar: लव रंजन यांच्या आगामी ‘पहला प्यार दूसरी बार’ या चित्रपटातील ‘पुराने दिन’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर चाहत्यांना लोकप्रिय ‘तेरा यार हूं मैं’ या गाण्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मैत्री, पहिलं प्रेम आणि कॉलेजच्या दिवसांतील निरागस आठवणींचं सुंदर चित्रण या गाण्यात पाहायला मिळत आहे.

‘तेरा यार हूं मैं’ची टीम पुन्हा एकत्र

‘तेरा यार हूं मैं’ हे मैत्रीवर आधारित लोकप्रिय गाणं आजही श्रोत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याला आकार देणारी अरिजित सिंग, रोचक कोहली, कुमार आणि लव रंजन यांची टीम आता ‘पुराने दिन’साठी पुन्हा एकत्र आली आहे.

‘तेरा यार हूं मैं’मधून मैत्रीच्या घट्ट नात्याची भावना व्यक्त झाली होती, तर ‘पुराने दिन’ हे गाणं प्रेक्षकांना जुन्या आठवणींच्या विश्वात घेऊन जातं.

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा हळुवार प्रवास

‘पुराने दिन’मध्ये कॉलेजच्या दिवसांतील मैत्री आणि पहिल्या प्रेमाची निरागस भावना पाहायला मिळते. वर्गात लपूनछपून एकमेकांकडे पाहणं, न बोलताही भावना समजून घेणं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहण्यासाठी असलेली उत्सुकता अशा अनेक हळुवार क्षणांचं चित्रण गाण्यात करण्यात आलं आहे.

तुषार छिब्बर, सरगुन कौर लूथरा, कुणाल वैद, साक्षी वैद्या, स्पर्श वालिया आणि अलीशा चोप्रा या सहा प्रमुख कलाकारांच्या कथेला हे गाणं भावनिक स्पर्श देतं. त्यांच्या पात्रांच्या मैत्रीपासून पहिल्या प्रेमापर्यंतचा प्रवास गाण्यातून उलगडताना दिसतो.

अरिजित सिंगच्या आवाजाची जादू

‘पुराने दिन’ला रोचक कोहली यांनी संगीत दिलं असून, अरिजित सिंग यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे. गीतकार कुमार यांनी लिहिलेल्या या गाण्यात पहिल्या प्रेमाची निरागसता आणि जुन्या आठवणींची ऊब जाणवते.

रोचक कोहली यांनी या गाण्याबद्दल आनंद व्यक्त करताना ‘तेरा यार हूं मैं’ला मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. ‘पुराने दिन’च्या माध्यमातून पहिल्या प्रेमाच्या निरागस भावनेचा वेध घेण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. ओळखीची भावना देतानाच नवा अनुभव देणारं गाणं तयार करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

‘पुराने दिन’मधून जुन्या आठवणींना उजाळा

गीतकार कुमार यांनी सांगितलं की, ‘तेरा यार हूं मैं’ आणि ‘पुराने दिन’ ही दोन्ही गाणी मैत्री आणि मोठं होताना आयुष्याशी जोडल्या जाणाऱ्या आठवणींच्या भावविश्वातून आली आहेत. महाविद्यालयीन जीवनातील मैत्री, पहिला क्रश आणि छोट्या-छोट्या गोष्टी खास वाटणारा तो निरागस काळ ‘पुराने दिन’मधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या गाण्यामुळे प्रेक्षकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आणि मित्रांसोबत घालवलेल्या जुन्या क्षणांची आठवण होत आहे.

२३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार चित्रपट

‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट लव्ह फिल्म्स प्रस्तुत करत आहे. अनुज सैनी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pehla pyaar doosri baar purane din song arijit singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड
1

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट
2

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू
3

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
4

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.