Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Prajakta Mali Birthday: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिने स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर आणि आई तळजाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 08, 2026 | 03:56 PM
Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ३७व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय.
  • प्राजक्ताने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला.
  • शरीराशी संबंधित कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले.
Prajakta Mali Take Big Decision News: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासाठी आजचा दिवस खास आहे. अभिनय, सूत्रसंचालन आणि आपल्या साध्या स्वभावामुळे प्राजक्ताने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती आपला ३७वा वाढदिवस साजरा करत असून, या खास दिवशी तिने स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाढदिवशीच नवा संकल्प

वाढदिवस म्हटलं की अनेक जण स्वतःसाठी एखादी नवीन सुरुवात करण्याचा विचार करतात. प्राजक्तानेही याच दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल करण्याचे ठरवले. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. प्राजक्ताने सकाळी श्री सिद्धिविनायक मंदिरात तसेच आई तळजाई मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर तिने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हा निर्णय केवळ ट्रेंड म्हणून घेतलेला नसून, त्यामागे तिच्या शरीराशी संबंधित कारण असल्याचेही तिने स्पष्ट केले. (Prajakta Mali Birthday:)

प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार, दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ खाल्ल्यानंतर तिला वारंवार कफाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे आता आहारातून दुग्धजन्य पदार्थ कमी करण्याचा किंवा पूर्णपणे टाळण्याचा तिचा विचार आहे. याच कारणामुळे पुढील काळात ती चहा किंवा कॉफी घेताना दिसली नाही, तर चाहत्यांनी त्याचे आश्चर्य मानू नये, असे तिने मजेशीर अंदाजात सांगितले.

शरीराचा संकेत महत्त्वाचा

आपल्या शरीराला एखादा पदार्थ मानवत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यात बदल करणे गरजेचे असते. प्राजक्तानेही आपल्या अनुभवातून हा निर्णय घेतल्याचे दिसते. काही पदार्थांमुळे शरीराची प्रतिक्रिया चांगली नसल्याचे तिने सांगितले असून, त्यामुळे आता आपल्या आहाराबाबत ती अधिक सजग राहणार आहे. प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये आता स्वतःला ‘क्रूरता फ्री’ व्यक्ती म्हणत एक वेगळीच मजेशीर टिप्पणी केली. तिच्या या शब्दांमुळे पोस्टला आणखी रंगत आली. गंभीर निर्णय सांगतानाही स्वतःची विनोदी शैली कायम ठेवण्याची तिची पद्धत चाहत्यांना चांगलीच आवडली.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्राजक्ताची पोस्ट समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या निर्णयाचे स्वागत केले. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच तिच्या नव्या प्रवासासाठीही शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर तिच्या पोस्टची चर्चा होण्यामागे तिच्या निर्णयासोबतच तिचा स्पष्ट आणि बिनधास्त अंदाजही कारणीभूत ठरला.

Filmfare Marathi Awards 2026: ‘गोंधळ’चा फिल्मफेअरमध्ये जलवा; 19 नामांकनांतून 6 पुरस्कारांची कमाई

प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. तिच्या निवेदनाची शैली, विनोद समजून घेण्याची पद्धत आणि कलाकारांसोबतचा सहज संवाद यामुळे कार्यक्रमात तिची वेगळी छाप पडते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातही तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

मालिकेपासून सुरू झाला लोकप्रियतेचा प्रवास

प्राजक्ताला मोठी ओळख मिळवून देणाऱ्या कामांमध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचा विशेष उल्लेख केला जातो. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर छोट्या पडद्याबरोबरच तिने चित्रपटांमध्येही आपली अभिनयाची झलक दाखवली.

चित्रपटांच्या माध्यमातूनही प्राजक्ताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘फुलवंती’ या सिनेमामुळे तिच्या कामाची पुन्हा मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. पारंपरिक ढाच्यात न अडकता वेगवेगळ्या भूमिका करण्याची तिची तयारी चाहत्यांना भावते.

Tanvi Kolte New Song: बिग बॉसनंतर तन्वी कोलतेचा नवा अंदाज; ‘या’ गाण्यामधून पहिल्यांदाच अल्बम साँगमध्ये Entry

वाढदिवसाची सुरुवात वेगळ्या विचाराने

यंदाचा वाढदिवस प्राजक्तासाठी फक्त सेलिब्रेशनपुरता मर्यादित राहिलेला नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत तिने एका नव्या पद्धतीने आयुष्याकडे पाहण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या नव्या सुरुवातीला चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि शुभेच्छा तिच्यासाठी नक्कीच खास ठरणार आहेत.

 

Web Title: Prajakta mali birthday actress decided to go vegan shared post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • actress prajakta mali
  • Entertainment marathi
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण
1

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का
2

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
3

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
4

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.