
फोटो सौजन्य सोशल मीडिया
हा बदलता ट्रेंड लक्षात घेता रेस्टॉरंट्सनी डिलिव्हरीकडे केवळ विक्रीचे माध्यम न पाहता आपल्या आदरातिथ्याचा (Hospitality) विस्तार म्हणून पाहायला हवे, असे मत बेलोना हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘ईशारा’चे (Ishara) संस्थापक प्रशांत इस्सर यांनी व्यक्त केले आहे.
बदलत्या ग्राहक मानसिकतेवर प्रकाश टाकताना प्रशांत इस्सर म्हणाले , जेव्हा कोणी कुटुंबीय किंवा मित्रांसोबतच्या डिनरसाठी अनेक पदार्थ ऑर्डर करतो, तेव्हा तो केवळ जेवण मागवत नसतो, तर यजमानपद भूषवत असतो. त्या संध्याकाळपुरते त्याने आमचे स्वयंपाकघर उसने घेतलेले असते. त्यामुळे जेवण वेळेत पोहोचण्यासोबतच, ज्या रेस्टॉरंटमधून ते आले आहे, त्याचा आदरातिथ्याचा मूळ अनुभव घरातही कायम राहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात
प्रीमियम रेस्टॉरंट्स आता प्रवासाचा विचार करून विशेष डिलिव्हरी मेन्यू तयार करत आहेत. रोटी-नानचा कुरकुरीतपणा टिकवणे, डंपलिंग्स सुरक्षित हाताळणे किंवा सॉस वेगळा पॅक करणे अशा विविध पातळ्यांवर बदल केले जात आहेत. तसेच, अशा मोठ्या ऑर्डर्ससाठी अति-वेगापेक्षा ठरलेल्या वेळेत आणि उत्तम स्थितीत जेवण पोहोचण्याला ग्राहक जास्त महत्त्व देत आहेत.
इस्सर यांनी पुढे नमूद केले की, “पूर्वी आम्ही आमच्या रेस्टॉरंटच्या दारात उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करायचो. आता ते दार शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेले कोणाचे तरी घर असू शकते. तिथे जे पोहोचेल, त्यात आमची ओळख आणि गुणवत्ता स्पष्टपणे दिसावी, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये डाइन-इन करावे किंवा घरी मागवावे, त्याला दोन्हीकडे एकसारखाच उत्कृष्ट अनुभव देणे हीच प्रीमियम रेस्टॉरंट्स समोरील मोठी संधी आहे.”