
फोटो सौजन्य सोशल मिडिया
याच धर्तीवर अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल अल-सईद यांनी मिशिगनमधील सिनेट निवडणुकीत विजय मिळवला आहे. या विजयासह अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणारे ते पहिले मुस्लिम ठरले आहेत. तसेच यांना मतदान करणारे जे कोण असतील तर ते पूर्णपणे मूर्ख झालेले लोक आहेत असे विधान ट्रम्प यांनी यांच्यासंदर्भात केले होते .
तेव्हा या विधानाची चर्चा देखील खूप झाली होती .जोहरान ममदानी यांच्या विरोधात सुद्धा ट्रम्प यांची रणनीती अशीच राहिली होती . न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा ट्रम्प यांनी धार्मिक कार्ड खेळायचा प्रयत्न करून पाहिला होता . तेव्हा सुद्धा अमेरिकेच्या नागरिकांनी ममदानी यांना निवडून दिले आणि अमेरिकेच्या राजकारणात कोणत्याही धर्माबद्दल ध्रुवीकरण करून सत्ता मिळवणे हे मान्य नसल्याचे आपल्या मतपेटीतून स्पष्ट सांगितले . त्यामुळे अब्दुल अल -सईद यांच्या विजयाकडे अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
Breaking News : भारतासाठी खुशखबर; इराणने भारतासाठी होर्मूझ केला खुला
मिशिगनमधील अटीतटीच्या निवडणुकीत अब्दुल अल-सईद यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार माइक रॉजर्स यांचा पराभव केला. या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने मिशिगनमधील महत्त्वाची सिनेटची जागा कायम राखली आहे. सिनेटच्या या लढतीकडे संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागले होते.
वयाच्या ४२व्या वर्षी अल-सईद यांनी अमेरिकेच्या राजकारणात मोठी झेप घेतली आहे. इजिप्तमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या विजयामुळे अमेरिकन सिनेटमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम प्रतिनिधित्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान अल-सईद यांनी सर्वसामान्य कुटुंबांचा वाढता खर्च कमी करणे, आरोग्यसेवा सर्वांसाठी उपलब्ध करणे आणि राजकारणातील मोठ्या कंपन्यांचा प्रभाव कमी करणे या मुद्द्यांवर भर दिला. त्यांच्या प्रचारातील ‘मेडिकेअर फॉर ऑल’ या भूमिकेलाही महत्त्व मिळाले. या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांना नवी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.