
Sae Tamhankar on Prajakta Mali Cannes look
Zee Marathi Serial : कामिनीला कळणार का कमळीचं सत्य? ‘कमळी’ मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो
स्वत:ला सुसंस्कृत म्हणावून घेणाऱ्या काही नेटकऱ्यांनी तिच्या या लूकला अंगप्रदर्शन म्हटले आहे. तिने मराठी संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अशा वेळी तिच्या या चर्चित लूकवर सई ताम्हणकरवे देखील आपली रोखठोर भूमिका मांडली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने प्राजक्ता माळीला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मुंबई टाईम्सला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सईने प्राजक्ताची बाजू घेत ट्रोलर्सचा समाचार घेतला.
ती म्हणाली, “मला प्राजक्ता माळीचा खूप अभिमान वाटतो. तिने ज्या ग्रेसने कान्सच्या रेड कार्पेटवर स्वत:ला सादर केलं ते मला खूप आवडलं. काही जणांना ते झोंबल असलं तरी ते एका अर्थी चांगलंच आहे. कारण यामुळे सिद्ध होते की, तिथे उपस्थित सर्वांचे लक्ष तिच्यावरच खिळले होते. ”
सई पुढे म्हणाली, कोणी काय कपडे घालावेत आणि काय नाही, हे ज्याचे त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे लोकांचे एक ठरलेल वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही काहीही करा, लोक बोलणारच. तुम्ही कान्सला गेलात तरी चर्चा होणार आणि नाही गेलात तरी लोक बोलणार. यामुळे लोकांच्या या नकारात्मकतेवर तक्रारी का करायच्या? या पेक्षा ते क्षण साजरे करा.
सई स्वत: तिच्या बोल्ड आणि हटके फॅशनसाठी ओळखली जाते. कान्सबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, मलाही कान्सच्या मंचावर जायला नक्कीच आवडेल. मला माझ्या एखाद्या चित्रपटाचे सादरीकरण कान्सच्या स्क्रीनिंवर अधिकृतपणे जाणे मला जास्त अभिमानास्पद वाटेल. वेगवेगळ्या स्टाईलचे पेहराव आणि नवनवीन फॅशन प्रयोग करणे हा आमच्या अभिनयाचा मुख्य भाग आहे. माझे काम मला जितके आवडेत, तितकाच मी ग्लॅमरस फोटोशूटचाही आनंद घेते असे ती म्हणाली.