फोटो सौजन्य: झी मराठी
मालिकेतील खलनायिका कामिनीला घाबरुन कमळीच्या आईने म्हणजेच सरुने गेले कित्येक वर्ष कमळीचं सत्य लपवून ठेवलं. हेच सत्य आता कामिनीला कळणार आहे. याबाबतचा प्रोमो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.अन्नपुर्णा आजी गेले कित्येक वर्ष तिच्या मोठ्या नातीचा शोध घेत आहे. तिच्या या प्रयत्नांना राजन देखील साथ देतो. राजनला देखील असचं वाटत की, गौरी म्हणजेच सरु आणि त्याची मुलगी कुठेतरी आहेत त्या अजूनही जिवंत आहेत. आणि याच आशेवर इतके वर्ष राहणाऱ्या अन्नपुर्णा आजीने महाजन कुटुंबातील संपत्तीचा काही हिस्सा हा तिच्या मोठ्या नातीच्या नावे केला आहे.
या सगळ्या प्रकरणामुळे कामिनी देखील गौरी म्हणजेच सरोजचा शोध घेत असते. जेव्हा केव्हा गौरी आणि तिची मुलगी सापडेल त्यांना महाजानांच्या कुटुंबात येऊ द्यायचं नाही हा तिचा प्रयत्न असतो. जेणेकरुन महाजनांची सगळी संपत्ती ही अनिकाला म्हणजेच कामिनीच्या नातीला मिळेल. त्याासाठी कामिनी वाट्टेल त्या थराला जाते. नुकत्याच दाखवलेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आता असं दिसून येत आहे की, कमळी महाजनांच्या घरात आल्यापासून जे जे काही घडत गेलं तो सगळा घटनाक्रम लक्षात घेत कामिनी कमळी हीच महाजनांची मोठी नात म्हणजे राजनची पहिली मुलगी आहे, असा तिला संशय येतो. आता हे सगळं खरं आहे की सरोजला पडलेलं स्वप्नं आहे हे येत्या काही दिवसात कळेल. मालिकेचा हा भाग येत्या 25 तारखेला दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील या ट्विस्टमुळे पुढे काय होणार ? कामिनी आखत असलेल्या कटकारस्थानात ती स्वत: अडकणार का ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.






