
Prakash Raj Reacts After Dharmendra Pradhan's Resignation (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. ज्येष्ठ अभिनेते प्रकाशराज यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाल पाठिंबा दिला होता. सोनम वांगचूक यांना स्वत:ता जंतर-मंतरला जाणून आपला पाठिंबा दर्शवला होता. आता अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला, यानंतर प्रकाश राज यांनी पोस्ट टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पोस्टमध्ये प्रकाश राज लिहितात की, माझ्या प्रिय ‘कॉकरोचेस’ (Cockroaches) चे खूप खूप अभिनंदन! तसेच, प्रिय सोनम वांगचुक सर आणि तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येकाचेही अभिनंदन. तुम्ही हे सिद्ध करून दाखवले आहे की, तुम्ही एका सत्तेला गुडघे टेकायला भाग पाडू शकता. असे प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
Congratulations ❤️❤️❤️ my Dear Cockroaches.. Dear Sonam wangchuk sir and every single one who stood by the youth . You Have proved that you can bring a regime down to its knees . 💪💪💪 #justasking pic.twitter.com/efMYgbzxlf — Prakash Raj (@prakashraaj) July 25, 2026
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी या विषयावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही कलाकार विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करत आहेत, तर काही संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याची गरज अधोरेखित करत आहेत. त्यामुळे आंदोलनाचा विषय केवळ राजकीय किंवा शैक्षणिक मर्यादेत न राहता समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचला आहे.
एकंदरीत, विद्यार्थी आंदोलनानंतर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे देशाचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, विविध नेत्यांची वक्तव्ये आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया यामुळे हा विषय अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतात आणि शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.